Alu Vadi Recipe In Marathi – अळुवडी रेसिपी

महाराष्ट्रात अनेक विविध प्रकारचे वेगवेगळे स्नॅक्स खाले जाते. अलुवडी त्यातील एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट डिश आहे. आलुवडी कितेक वरशांपासून महाराष्ट्र वाश्यांची प्रिय डिश आहे. अलूवडी ही खाण्यात स्वादिष्ट आहेच त्यासोबत शरीरासाठी गुणकारक आहे.

ह्या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आळू वडी बनवण्याची सर्वात सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी शेअर करत आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत रेसिपी नक्की शेअर करा.

आळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • 2 वाटी बेसन पीठ
 • 2 ते 3 आळूची काळसर देठाची पाने
 • आले, लसूण आणि मिरची चे पेस्ट
 • 2 छोटी चमचा हळद
 • 2 छोटे चमचा लाल तिखट
 • 1 छोटी चमचा साखर
 • 2 छोटे चमचा गोडा मसाला
 • खीसलेला गूळ
 • आर्धी वाटी चिंचेचा कोळ
 • शेंगदाण्याचे कूट
 • खोबर
 • तीळ
 • 2 छोटी चमचा धने जिरे पावडर

विधी:

 1. आळु च्या वड्या बनविण्यासाठी सर्वात पहिला सगळे दिलेले मसाले एकत्र करून नीट मिक्स करून घ्यावे.
 2. थोड्यावेळाने कोमट पाणी घेऊन वरील मिश्रण भाजून घ्यावे.
 3. आता एक परात किंवा मोठे ताट घ्यावे आणि त्याला नीट स्वच्छ धुवून घ्यावे, परात नीट स्वच्छ धुवून झाल्यावर त्यावर अळूचे पान पसरावे. लाटनाच्या सहायाने पणाला पसरट करून घ्यावे.
 4. आता बनवलेले मिश्रण हाताने आळूच्या पानावर नीट पसरून घ्यावे. आता दुसरे आळुचे पान घ्यावे आणि ते उलट्या बाजूने पहिल्या पानाच्या टोकाच्या विरुद्ध दिशेने पानावर ठेवावे.
 5. ह्या पानालाही नीट मिश्रण लावून घ्यावे. अशा प्रकारे पाने आणि मिश्रण नीट लावून घ्यावे.
 6. सर्व पाने आणि मिश्रण लावून झाल्यावर, उजव्या आणि डाव्या बाजूने मध्यल्या बाजूला आलुची जी पाने लावली होती ती पाने दुमडून घ्यावे.
 7. असे करत करत आळूचे रोल बनवून घ्या व राहिलेले मिश्रण हे आलूच्या पानांना लावा. आळुच्या पानांचा रोल बनवत असताना मध्ये मधे मिश्रणाचा हाथ फिरवत जावा.
 8. आता रोल वळून झाल्यावर रोल क्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या टोकाला मिश्रण लावावे.
 9. ज्या पात्रमधे आळु ची वडी उकड काध्ययचे आहे ते पात्र नीट पणीने धुवून घ्यावे.
 10. आपण बनवलेला अळू रोल हे नीट उकडून घ्यावे. उकडून घेतलेले आळू वडी देखील खाण्यात स्वादिष्ट असतात.
 11. आता एक कढई घ्या आणि त्यामधे अळू वडी तळण्यासाठी तेल मध्यम आचेवरिल गॅस वर गरम करावे. तेल गरम होऊ पर्यंत आळू च्या रोल ला सुरी च्या सहायाने नीट कट करून घ्यावे.
 12. बनवलेले अळू वडी नीट मध्यम आचेवर तळून घ्यावे नाहीतर आळू वडी सगळे तेलात सुटेल. आपले आळू वड्या तयार आहेत तुम्ही हे असेच सर्व्ह करू शकता.

Related posts

Leave a Comment