भाकरवाडी रेसीपी | Bhakarwadi recipe in Marathi

भाकरवडी ने आज महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील लोकांना दिवाणे बनवले आहे त्याच्या टेस्ट ने. आज प्रतेक महाराष्ट्रीयन ने भकरबवडी चा स्वाद नक्कीच घेतला असावा. भाकरवडी ची सुरुवात महाराष्ट्रातून च झाली होती. खायला भाकरवडी चा टेस्ट गोड आणि नमकिन असतो.

भाकरवाडी रेसीपी

भाकरवडी बनविणे देखिल खुप सोपे आहे, आज ह्या पोस्ट च्या द्वारे आम्ही तुम्हाला भाकरवडी बनविण्याचे बेस्ट रेसिपी शेअर करणार आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना आणि घरच्यांना नक्की शेअर करा.

भाकरवडी च्या आवरणासाठी लागणारे साहित्य:

 • 100 ग्रॅम मैदा पीठ
 • 2 मोठे चमचे बेसन
 • 1 मोठे चमचे गरम तेलाचं मोहन
 • 1 छोटे चमचे लाल तिखट पावडर
 • 1 छोटे चमचे ओवा
 • 1 छोटे चमचे स्वादानुसार मिठ
 • भाकरवडीच्या सारणासाठी वस्तू:
 • 1 मोठे चमचे जिर
 • 1 मोठे चमचे पांढरे तीळ
 • 4 मोठे चमचे सुक खोबरं
 • 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1 छोटे चमचे जिरा पावडर
 • 2 छोटे चमचे धने पावडर
 • 2 छोटे चमचे लाल तिखट पावडर
 • चवीनुसार लागणारे मीठ
 • 2 मोठे चमचे बारीक शेव
 • 1 मोठे चमचे साखर
 • 2 मोठे चमचे चिंच आणि गुळाची चटणी

भाकरवडी बनविण्यासाठी स्टेप्स:

 1. एक परात घ्या आणि त्यामधे मैदा, बेसन, लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ, ओवा आणि तेलाचं मोहन टाकावे आणि मिक्स करून घ्यावे. मधी मधी थोड थोड पाणी घालून ह्या मिश्रण चा गोळा नीट मळून घ्या.
 2. आता आपण भाकरवडीच्या आतील मसाला बनवणार आहे, एक कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यामधे जीरा, सुखं खोबर, तीळ, आणि कोथिंबिर घालून भुंनुन घ्यावे. हे भूनल्यावर गॅस बंद करून एक मिक्सर जार घ्या आणि त्यामधे हे घाला आणि नीट पिसून घ्यावे.
 3. वाटून घेतलेल्या मिश्रणा मद्ये लाल तिखट पावडर, धने पावडर, जीरा पावडर, मीठ, शेव आणि साखर घालून नीट परत मिक्सरला पिसुन घ्यावे.
 4. आधी मळून घेतलेल्या पिठाची पारी लाटून घ्यावे आणि त्यावरती चिंच आणि गुळाची चटणी नीट पसरून लावून घ्यावे. त्या पारीवर नंतर तयार केलेले सारण आणि शेव पसरत लावावे. त्या पारीचे नीट रोल बनवून घ्यावे आणि भाकरवडी सारखे कट करून घ्यावे.
 5. आता एक कढई घावे आणि त्यामधे भाकरवडी पूर्ण तळतील एवढे तेल घालून मध्यम आचेवर गॅस वर गरम करावे. तेल गरम होताच तेलामध्ये भाकरवडी नीट 8 मिनिटांसाठी तळून घ्यावे.
 6. तुमचे कस्ते भाकरवडी तयार आहे, तुम्ही असेच भकरवडी खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबत लावून खाऊ शकता.

Related posts

Leave a Comment