दाल तडका रेसिपी | Dal Tadka Recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतात अनेक प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात त्या पैकी एक म्हणजे दाल तडका. खूप लोकांना दाल तडका आणि दाल फ्राय मधे फार कन्फ्युजन होत असते. पण जास्त फरक नसते या दोन भाज्यांमध्ये. खूप सर्व हॉटेल्स मधे दाल तडका आणि दाल फ्राय एकाच रेसिपी ने बनविले जाते.

दाल तडका रेसिपी | Dal Tadka Recipe in Marathi

दाल तडका हे संपूर्ण भारतात खूप चाव ने खाल्ले जाते. दाल तडका हे मेन देल्ही आणि उत्तर भारतात खाल्ले जाते. बासमती तांदूळ आणि दाल तडका हे कॉम्बिनेशन खाणे प्रत्येक फूड लवर ला फार आवडते. दाल तडका बनविण्याची रेसिपी देखील फार सोपी आहे. काही मिनिटांमधे ही रेसिपी तयार होऊन जाते.

तर चला मग मित्रांनो दाल तडका च्या रेसिपी ला सुरुवात करुयात. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की ही रेसिपी तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Dal Tadka Recipe In Marathi

बनविण्यासाठी लागणारा वेळ: 20 मिनिटे

तयारी साठी लागणारा वेळ: 10 मिनिटे

दाल तडका बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • तुर दाल 3/4 कप
 • चना दाल 1/4 कप
 • 1 मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला
 • 1 मध्यम कांदा (आरधा कांदा बारीक चिरा आणि आर्धां उभा चिरुन घ्या)
 • सुक्या लाल मिरच्या 2
 • 1 उभी चिरून हिरवी मिरची
 • 2 ठेचून लसणाच्या पाकळ्या
 • 2 छोटे चमचे तूप डाळीच्या फोडणीसाठी
 • 1 छोटे चमचे तूप डाळीला वरून फोडणी देण्यासाठी
 • 5 मोहरी चे दाने (1/8 छोटे चमचा)
 • 1/4 छोटे चमचे हळदी
 • 4 कढीपत्ता पाने
 • 1/2 छोटे चमचे जिरा
 • चिमुटभर हिंग
 • 1 छोटे चमचे लिंबाचा रस
 • चवीनुसार मीठ

कृती:

 1. डाळ तडका बनविण्यासाठी सर्वात पहिला एक कुक्कर घ्या आणि त्यामधे तूर डाळ आणि चणाडाळ आणि लागेल तेवढे पाणी घालून दाल शिजू पर्यंत कुक्कर गॅस वर ठेवावे. दोन्ही दाल नीट शिजल्या तर त्यांना नीट घोटून घ्यावे.
 2. आता एक कढई घ्यावी आणि त्यामधे तेल टाकून गॅस वर ठेवावे आणि आपण आर्ध कांदा जो उभा चिरला होता नीट तळून घ्यावे आणि खरपूस रंग येऊ पर्यंत नीट तळावे. ह्या तळ लेल्या कांद्या मुले दाल तडक्या ला टेस्ट चांगलं येतो.
 3. आता त्याच कढई मधे 2 छोटे चमचे तूप घालावे. आता त्यामधे मोहरी घालून मोहरी नीट तड तडून घ्यावी. मोहरी तडल्या नंतर त्या कढई मधे हळद, हिंग, 2 कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेला कांदा, आणि हिरवी मिरची घालून नीट हे सर्व भाजून घ्यावे.
 4. जेव्हा हे मिश्रण चॉकलेटी रंगाचा होईल तेव्हा यामधे टोमॅटो घालावे आणि नीट भाजून घ्यावे.
 5. आता आपण घोटलेली दाल या कढई मधे घालावी आणि लागेल तेवढे पाणी घालून चवीनुसार मीठ टाकून ह्या मिश्रणाला एकदा उकळी येऊ द्या. लिंबाचा रस घालून नीट हे मिश्रण मिक्स करून घ्यावे.
 6. आता आपण तडक्याची तयारी करत आहोत तर एक वेगळी कढई घ्यावी आणि त्यामधे 1 छोटे चमचे तूप घालावे आणि गॅस वर ठेवावे. आता जिरं, लसूण आणि कडीपत्ता घालून नीट भाजून घ्यावेत.
 7. जेव्हा लसूण जरा लाल रंगाचा दिसू लागेल या मधे लाल मिरची टाकून नीट भाजून घ्यावे आणि गॅस बंद करावे आणि ही फोडणी म्हणजे तडका बनवलेल्या डाळीत टाकावे.
 8. आपण तळलेला कांदा आणि बारीक चिरलेले कोथिंबीर ने सजवून तुम्ही ही दाल चपाती किंवा रोटी सोबत सर्व्ह करू शकता.

Related posts

Leave a Comment