ढोकळा रेसिपी मराठी | Dhokla Recipe in Marathi

ढोकळा हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतात फार फेमस आहे त्याच्या टेस्ट साठी. ढोकळा जितके स्वादिष्ट आहे तेवढीच त्याची सोप्पी रेसिपी आहे. ढोकळा हे मूळ गुजराती डिश आहे, पण त्याच्या चांगल्या टेस्ट मुळे ही डिश सरवत्र फेमस आहे. महाराष्ट्रात तर ढोकळा साधारण सगळ्याच हल्वाईंच्या दुकानात भेटत.

Dhokla Recipe in Marathi |

जास्त करून लोक देखील हलवाई च्या दुकानातून आणतात, कारण त्यांना वाटते ढोकळा बनवने अवघड आहे पण खरतर ढोकळा बनवणे खूप सोपे आहे. आणि खूप लवकर होणारे हे रेसिपी आहे.

ढोकळा बनवण्यासाठी कमी सामानाची गरज असते, आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्या पासून आपण ढोकळा तयार करू शकता. ह्या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत ढोकळा कसे बनवतात मराठी मद्ये याची रेसिपी शेअर करणार आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रांना आणि घरच्यांना नक्की शेअर करा.

सामग्री:

 • 1 टेबलस्पून रवा
 • 1/2 कप बेसन
 • 1 कप दही
 • 1/2 कप पाणी
 • 1/4 बारीक चमचा हळद
 • 1 चमचा हळद
 • 1/2 बारीक चमचा सोडा किंवा इनो
 • 1 टेबलस्पून तेल
 • चवीनुसार मीठ
 • 1 टेबलस्पून आल लसूण आणि हिरवी मिरची चे पेस्ट
 • 1/2 छोटा चमचा मोहरी
 • 1/2 टेबलस्पून साखर पावडर
 • 1/2 टेबलस्पून हिंग
 • 3 ते 4 हिरव्या मिरच्या
 • 3 ते 4 कडीपत्ता

ढोकळा बनवण्याची विधी:

ढोकळा बनवण्यासाठी एक भांडी घ्या आणि त्यामधे दही, बेसन, रवा आणि जरा पाणी घालून नीट मिक्स करा. लक्ष्य द्या हे मिश्रण फारच पातळ किंवा जाड होऊ नये याची काळजी घ्या. हे मिश्रण मध्यम झाले पाहिजे.

ह्या मिश्रण मद्ये चवीनुसार मीठ, सोडा किंवा ईनो, हळद, तेल आणि आले लसूण आणि हिरव्या मिरची चे पेस्ट घालून नीट मिक्स करून घ्या.

आता एक भांड घ्या ज्याच आकार गोल असावा किंवा चौकोनी असो. त्या भांड्याला नीट तेल किंवा तूप लावून घ्या. आणि त्या भांड्यामधे ते मिश्रण घालून घ्यावे.

आता प्रेशर कुकर घ्या किंवा इडली बनवण्याचे कुकर घ्या आणि त्या मद्ये हे मिश्रण घ्यावे.

कुकर आता 4 ते 5 शिट्टयानसाठी मध्यम आचे वरील गॅस वर ठेवावे. 5 ते 6 मिनिट झाल्यावर गॅस बंद करून बगा ढोकळा तयार आहे की नाही. जर नसेल तर पुन्हा 1 ते 2 मिनीटांसाठी लावून ठेवावे.

जर ढोकळा तयार असेल तर ते भांडे काडून 10 ते 12 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवून देणे.

आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यामधे 1/2 कप पाणी घालून मध्यम आचे वरील गॅस वर ठेवावे. त्यामधे साखर आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करा.

आता भांड्यात असलेला ढोकळा काढण्याची वेळ आली आहे. चाकू च्या सहायता ने त्याला नीट चौकोनी आकारा मद्ये कट करून घ्यावं.

कट केलेल्या धोकलेच्या पिसान वरती मीठ आणि साखरेचं पाणी शिंपडून टाका. लक्ष्य द्या की ढोकळा जास्त ओला होणार नाही.

आता आपण धोकल्याला तडका देणार आहोत, एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यामधे तेल टाकून मध्यम आचेवर गॅस वर गरम करा.

तेल गरम झाल्यावर त्या पॅनमधे कडीपत्ता, हिंग, मोहरी आणि हिरव्या मिरच्या टाकून नीट तडका तयार करा. 1 मिनिटा साठीच हे भाजावे.

1 मिनिटांनंतर हा तडका धोकल्या वर घालून ढोकळा लाल सॉस किंवा पुदिनाची चटणी सोबत सर्व्ह करावे.

Related posts

Leave a Comment