Vada Pav Green Chutney Recipe In Marathi | वडापाव सोबत खाणारी हिरवी चटणी कशी बनवतात

वडापाव खाताना जर हिरवी चटणी नसेल तर मग आपल्याला त्या वडापाव चा टेस्ट देखील येत नाही. ती वडापाव सोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी वडापाव ला आणखी स्वादिष्ट बनवण्याचे काम करते. जर तुम्हाला देखील वडापाव सोबत खाल्ली जाणारी ही हिरवी चटणी आवडत असेल तर कॉमेंट करा. 

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi

आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून ही वडापाव सोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी कशी बनवतात हे शिकणार आहोत. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला मग रेसिपी चालू करुया. 

चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 

 • 2 मोठे चमचे नमकीन बूंदी 
 • 2 मोठे चमचे भाजलेले चणा डाळ
 • लागेल तसे पाणी किंवा दही
 • 9 ते 10 हिरव्या मिरच्या 
 • अद्रक चा 2 इंच तुकडा
 • 4 लसूण च्या पाकळ्या
 • 1/2 छोटे चमचे जिरे
 • 1 कप चिरलेले कोथिंबीर
 • 1 मोठे चमचे पुदिन्याची पाने 
 • 2 छोटे चमचे लिंबाचा रस
 • 1 छोटे चमचे खडा नमक किंवा रॉक मीठ

चटणी बनवण्यासाठी कृती (Vada Pav Green Chutney Recipe In Marathi) : 

ही हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वात पहिला एक मिक्सर चे जार घ्या आणि त्यामधे वरील दिलेले सर्व साहित्य नीट वाटून घ्यावे. 

लागेल तसे पाणी टाकावे पण जास्त ही पाणी टाकू नये. नीट मिक्स करून झाल्यावर तुमची वडापाव ची हिरवी चटणी तयार आहे. तुम्ही ही चटणी 10 ते 15 दिवसांसाठी फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता. 

Related posts

Leave a Comment