Idli Recipe in Marathi | इडली रेसिपी मराठी 

Idli Recipe in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या पोस्ट मद्ये इडली चे पीठ कसे बनवतात हे जाणून घेणार आहोत. प्रत्येकाला इडली आणि डोसा फार आवडतो ते महाराष्ट्रातील लोकांना असो किंवा साऊथ मधील. पण इडली चे पीठ कसे बनवतात हे माहीत नसते, तर आज आम्ही तुम्हाला ह्या पोस्ट च्या माध्यमातुन इडली चे पीठ कसे बनवतात ते सांगणार आहोत, म्हणजेच थोडक्यात आम्ही तुम्हाला इडली रेसिपी मराठीमधे देणार आहोत ह्या पोस्ट मद्ये. 

Idli Recipe in Marathi

Idli Recipe in Marathi

Idli Recipe in Marathi | इडली रेसिपी मराठी 

साहित्य: 

 • 2 आणि अर्धा कप तांदूळ 
 • 1 कप उडीत डाळ
 • 1 चमचा मेथीचे बियाणे 
 • 1 कप पोहे 
 • 1 चमचा चवीनुसार मीठ

इडली बनवण्याची प्रक्रिया | Rice Idli recipe in marathi 

 1. सर्व प्रथम एक भांडे घ्यावे, त्यात पाणी आणि तांदूळ टाकून नीट तांदूळ धुवून घ्यावे. तांदूळ धुळ्यानंतर त्याच भांड्यात ते तांदूळ 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवावे. 
 2. दुसऱ्या भांड्यात उडीत डाळ व मेथी बियाणे स्वच्छ धुवून घ्यावे आणि तेही 4 तासांसाठी भिजत ठेवावे. 
 3. पोहे ही स्वच्छ धुवून घेऊन त्याला ही 5 मिनिटांसाठी भिजत ठेवा. 
 4. 4 तासानंतर जी डाळ आपण भिजत घातली होती त्याची मिस्कर ला पेस्ट बनवून घ्यावे. 
 5. आता त्या मिक्सर च्या भांड्यात तांदूळ आणि पोहे घालून लागेल तसे थंड पाणी घालून बारीक करून घेणे. 
 6. आधी केलेल्या डाळीच्या पेस्ट मद्ये आता बनवलेले पेस्ट मिस्क करावे. 
 7. हे तयार झालेले मिक्स 10 ते 12 तासांसाठी झाकून ठेवावे. 
 8. नंतर 10 ते 12 तासांनी त्यात चवीनुसार मीठ घालावे. 
 9. इडली बनवण्यासाठी इडली बनवण्याचे स्टँड घ्या आणि त्यात तेल लावून त्यात तयार असलेले मिक्स घालावे. 
 10. इडली बनविण्याच्या कुक्कर मद्ये खाली थोडे पाणी घालावे आणि गॅस चालू करून 20 मिनिटांसाठी मध्यम आचेवर ठेवून द्यावे. 
 11. 20 मिनिटे झाल्यावर ते इडली भांडे साइडला काढून ठेवावे 5 मिनिटांसाठी. 
 12. तुमची इडली तयार आहे आता हे इडली गरमागरम सांबर आणि चटणी सोबत सर्व्ह करा.  

Related posts

Leave a Comment