खोबऱ्याचे लाडू रेसिपी मराठी | Khobryache Ladoo Recipe in Marathi 

खोबऱ्याचे लाडू प्रतेक महाराष्ट्रीयन ने खालेच असतील, ह्याचे टेस्ट आणि पोषक तत्व देखील नंबर वन आहेत. म्हणून हे खाणे डॉक्टर्स देखील सांगतात. जर तुम्ही व्यायाम किंवा जिम करता तर हे लाडू तुमच्या साठी खूप उपयोगी ठरेल. नारळ मद्ये जास्त प्रमाणात आयरोन असत, त्यामुळे आपले हाड्ड मजबूत होतात. 

खोबऱ्याचे लाडू

जर तुम्हाला खोबऱ्याचे लाडू बनवता येत नसेल तर आज आमच्या पोस्ट च्या माध्यमातून शिकून घ्या. आज आम्ही ह्या पोस्ट मद्ये खोबऱ्याचे लाडू कसे बनवतात याची सर्वात सोप्पी आणि टेस्टी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना शेअर करा. 

खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • 3 ते 4 कप खोबऱ्याचे बारीक किस  
 • 1.5 कप साखर  
 • 1 ते 1.5 कप पाणी   
 • 2 छोटे चमचे तूप  
 • 1/4 छोटा चमचे वेलची पूड 

कृती: 

 1. खोबऱ्याचे लाडू बनविण्यासाठी सर्वात प्रथम एक कढई घ्या त्यामधे 2 छोटे चमचे तेल टाकून मध्यम आचेवर गॅस वर गरम करून घ्या, तूप गरम झाल्यावर त्यामधे खोबऱ्याचे किस घालून नीट मिक्स करून घ्यावे. 
 2. 2 मिनिटांनी गॅस बंद करावे आणि हे मिश्रण एका प्लेट मधे काढून ठेवावे थंड होण्यासाठी. 
 3. आता आपण साखरेचा पाक बनवणार आहोत, एक भांड घ्या आणि त्यामधे पाणी टाकून गॅस वर हाई फ्लेम वरती गरम करावे. पाणी गरम होण्याआधी त्यामधे साखर टाकून नीट मिक्स करून घ्यावे. 
 4. आता साखर आणि पाणी नीट मिक्स झाल्यावर गॅस मध्यम आचेवर करावे, आणि त्यामधे खोबऱ्याचे मिश्रण आणि विलयची पावडर घालून चांगल मिक्स करून घ्यावे. 
 5. हे मिश्रण 7 मिनिटांनी घट्ट होऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करा आणि हे मिश्रण एका भांड्यात काडुन साइडला थंड होण्यासाठी ठेवून द्या. 
 6. हे मिश्रण थंड झाल्यावर तूप घेऊन आपल्या दोन्ही हाताला लावा आणि ह्या मिश्रणाचे गोळे बनवून घ्या. 

Related posts

Leave a Comment