अस्सल कोल्हापुरी मिसळ पाव रेसिपी – Misal Pav Recipe In Marathi

Misal Pav Recipe In Marathi: मिसळ पाव म्हंटले की सर्वांच्या तोंडावर पाणी सुटते, आज ह्या पोस्ट द्वारे आम्ही तुमच्या सोबत अस्सल कोल्हापुरी मिसळ पाव रेसिपी शेअर करणार आहोत.

महाराष्ट्रात तर ही डिश खूप आनंदाने आणि उत्साहाने खाल्ले जाते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हॉटेल्स मध्ये मिसळ पाव नाही भेटेल असे होणारच नाही. मिसळ म्हणजे थोडक्यात रस्सा असतो मटकीचा आणि त्यासोबत आपण फरसाण आणि कांदा मिक्स करून पावसोबत खातो. मिसळ पाव विविध प्रकारचे असतात जसे पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिक ची मिसळ आणि सोलापुरी मिसळ. सर्वांमध्ये चव ही वेगवेगळी असते जसे कोल्हापुरी मिसळ ही जास्त तिखट असते आणि पुणेरी देखील थोडी तिखट असते. नाशिक ची मिसळ गोड असते. मिसळ पाव बनवण्यासाठी जास्त साहित्य देखील लागत नाही आणि ही रेसिपी खूप कमी वेळात तयार होते.

जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि काही डाऊट असेल तर आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा. तर चला मग सुरू करूया आपली मिसळ पाव रेसिपी.

लागणारे साहित्य:

 • 2 कप मोड आलेली मटकी
 • 6 लादी पाव
 • 1/2 कप फरसाण
 • किसलेले ओल्ल खोबर 1/2 कप
 • 2 कांदे (बारीक चिरलेले)
 • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
 • 1 इंच आले
 • 6 लसूण च्या पाकळ्या
 • कोथिंबीर
 • कडीपत्ता
 • थोडा गूळ
 • 2 चमचे लिंबू चा रस
 • 1 चमचा लाल तिखट पावडर
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1 चमचा धणे पावडर
 • 1 चमचा हळद
 • 2 चमचे तेल
 • 1 चमचा मोहरी
 • 1 चमचा जिरे
 • चवीनुसार मीठ

मिसळ पाव रेसिपी ची कृती:

 1. पहिले मोड आलेली मटकी एका भांड्यात घ्या आणि नीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, मटकी धुतल्यानंतर कुक्कर च्या भांड्यात टाका व त्यासोबत हळद, मीठ, आणि पाणी टाका. गॅस चालू करा आणि मटकी नीट शिजवून घ्या. साधारण 1 ते 2 शिट्या लागतील मटकीला शिजायला. शिजून झाल्यावर मटकी ला साईड ला ठेवून द्यावे.
 2. आता आपण मिसळ पाव चा मसाला तयार करूयात, एक कढई घ्या आणि गॅस वर ठेवा. कढई मध्ये तेल टाका. तेल गरम होताच त्यामधे लसूण, आले, कांदा, ओले खोबरे, टोमॅटो टाकून नीट मिक्स करा. त्याची पेस्ट तयार करा. आणि गॅस बंद करून. कढई साईड ला ठेवा.
 3. आता एक वेगळी कढई घ्या आणि त्यामधे तेल टाकून गॅस वर ठेवा. त्या कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी, कडीपत्ता आणि जिरे टाका. जिरे आणि मोहरी फुटल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट पावडर, धने पावडर आणि गरम मसाला घाला. मसाल्यांचा सुवास येऊ पर्यंत मासाले मध्यम आचेवर नीट भाजून घ्या.
 4. आता कढई मधे आधी बनवलेला मिसळ मसाला टाका (टोमॅटो, ओल खोबर, आले, कांदा आणि लसूण च पेस्ट). ह्या मिश्रणाचे जो पर्यंत सुगंधित वास येत नाही तो पर्यंत हे मिश्रण मध्यम आचेवर नीट भाजून घ्यावे.
 5. आता ह्या मधे शिझवलेली मटकी, मीठ आणि गुळाचा तुकडा घाला आणि नीट मॉक्स करून घ्या. आता यामधे लागेल तसे पाणी घालून नीट शिझवून घ्या.
 6. मिसळ नीट शिझन्यासाठी कढई ला मध्यम आचेवरती च ठेवा आणि झाकण ठेवा त्यावर. नीट उकल्यानंतर आपली मिसळ अधिक स्वादिष्ट होईल.
 7. मिसळ वरती तेल दिसू लागले तर समजा की आपली मिसळ तयार आहे.
 8. सर्व्ह करताना लक्षात घ्या पहिला शिझवळेली मटकी (जर शिल्लक असेल तर), मग फरसाण आणि त्यावर आपला मिसळ टाकून मग त्यावर कोथिंबीर आणि कांदा टाकावे. आणि त्यावर मग लिंबू पिळून सर्व्ह करावे.
 9. पाव भाजयचे असेल तर एक तवा घ्या मध्यम आचेवरील गॅस वर त्यामधे तूप किंवा बटर टाकून पाव नीट भाजून घ्यावे.

Related posts

Leave a Comment