मिसळपाव रेसिपी मराठी | Misal Pav Recipe in Marathi

मिसळपाव रेसिपी मराठी | Misal Pav Recipe in Marathi | Misalpav Recipe in Marathi 

Misal Pav Recipe in Marathi: मिसळपाव महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्रीयन आहे आणि मिसळ पाव नाही खाले तर मग काही मजा नाही. मिसळ पाव लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप फेमस आणि स्वादिष डिश आहे. जी प्रत्येकाला आवडेल खायला. म्हणून काही फंक्शनस मधेही ही डिश बनवली जाते जसे बडे किंवा लग्न. 

आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून मिसळ पाव कशे बनवतात हे जाणून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आम्ही खाली तुम्हाला ही रेसिपी शेअर केली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रा किंवा फॅमिली मेंबर सोबत शेअर करा. 

मिसळपाव रेसिपी मराठी | Misal Pav Recipe in Marathi

मिसळपाव रेसिपी मराठी | Misal Pav Recipe in Marathi

साहित्य: 

 • 3 चमचे तेल 
 • आर्ध कप बारीक किसलेले नारळ 
 • 3 बारीक चिरलेले कांदे 
 • आल लहसुन पेस्ट 
 • 2 टोमॅटो 
 • 1 चमचा धणेपूड पावडर 
 • आर्ध चमचा हळद 
 • 1 चमचा कीचेन किंग मसाला किंवा गोड मसाला 
 • 1 चमचा चवीनुसार मीठ 
 • 1 चमचा लाल तिखट 
 • 250 ग्राम भिजवलेली मटकी 
 • 3 ते 4 ग्लास पाणी 
 • फरसाण
 • शेव 
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 2 चमचा लिंबाचा रस 
 • चिरलेले लिंबू 

कृती: 

 1. मिसळ पाव बनवण्यासाठी पहिला, बारीक किसलेला नारळ घ्या आणि गॅस वर तवा ठेवा. त्या तव्यावर हा बारीक चिरलेला नारळ लालसर होऊ पर्यंत भाजून घ्या. 
 2. एकदा का किसलेला नारळ लालसर झाला तर मग त्याला मिक्सर ला लावून बारीक करून घ्या. 
 3. त्याच तव्यमढे 1 चमचा तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, आणि आल लसूण पेस्ट घाला. हे 6 ते 10 मिनिटांपर्यंत मध्यम आचेवर लालसर होऊ पर्यंत भाजून घ्यावे. 6 ते 10 मिनिटांनी त्यामधे टोमॅटो मिक्स करा आणि त्याला ही 4 ते 5 मिनिटा प्रयत्न शिझवून घ्या. 
 4. थोड्या वेळासाठी गॅस बारीक करा आणि हे सगळं थंड हौद्या, आता गॅस बंद करा आणि जसे हे मिश्रण थंड होईल तेव्हा हे नारळाच्या किसासोबत मिक्सर ला लावून त्याचे पेस्ट बनवून घ्या. 
 5. आता काधयीत 1 चमचा तेल घाला आणि गॅस मध्यम आचेवर गरम करा 3 मिनिटांसाठी. आपण बनवलेले मिश्रण कढई मद्ये टाका आणि 4 ते 5 मिनिटांसाठी गॅस चा मध्यम आचेवर गरम करा.
 6. आता त्यामधे 1 चमचा धणे पुढं पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला किंवा गोड मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. जर तुमच्या कडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला ही चालेल. 
 7. साईड ला कुकर मद्ये भिजवेली मटकी शिजायला टाका 2 शिटी झाल्यावर ते साइडला काढून ठेवा. 
 8. आता त्या मटकी ठेवलेल्या भांडी मद्ये थोड पाणी, मीठ आणि हळद घाला आणि मिक्स करून घ्या. 
 9. आता हा मटकी चा मिश्रण आणि आपण बनवलेले आमटी चे मिश्रण तुम्ही मिक्स करू शकता पण जर तुम्हाला वेगळे खायला आवडतं असेल तर मग तुम्ही असेच सर्व करू शकता. 
 10. मिक्स केल्या नंतर 1 चमचा निंबु चा रस देखील मिक्स करा. आणि 4 ते 5 मिनिटांसाठी गॅस मध्यम आचेवर ठेवा. 
 11. आता तुमची मिसळ तयार आहे सर्व्ह करताना बारीक चिरलेले कांदे, पाव आणि चिरलेले लिंबू सोबत हे मिसळ खावे. 
 12. पाव जर तुम्हाला भाजलेले हवे असतील तर तव्यावर थोडे बटर किंवा तूप टाकून पाव भाजून घ्या, आणि सर्व्ह करा. 
 13. आशा आहे की तुम्हाला ही मिसळ पाव ची रेसिपी आवडली असेल, आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत ही रेसिपी आताच शेअर करा. 

Related posts

Leave a Comment