स्वादिष्ट पनीर भुर्जी कशी बनवाल | Paneer Bhurji Recipe In Marathi

Paneer Bhurji Recipe

पनीर भुर्जी रेसिपी

पनीर भुर्जी महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतामधील सर्वात फेमस आणि स्वादिष्ट डिश आहे. पनीर हे दुधा पासून बनवले जाते, म्हणून ही डिश हेल्थी आहे. पनीर ला क्रश करून ही भाजी बनविले जाते. ही भाजी थोडी थोडी अंडा भुर्जी सारखी दिसते पण टेस्ट मद्ये फार फरक आहे.

पनीर भुर्जी बनविणे देखील खूप सोपे आहे, आज आम्ही ह्या पोस्ट च्या माध्यमातून पनीर भुर्जी ची सर्वात सोप्पी रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना नक्की शेअर करा.

Read This also:-

पनीर भुर्जी बनवण्यासाठी सामग्री (Ingredients to make Paneer Bhurji):

 • 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
 • 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
 • 1/2 चमचा पाव भाजी मसाला
 • 1 कप पनीर स्मॅश केलेले.
 • 2 टेबलस्पून तेल
 • 1 बारीक चमचा जिरं
 • 1/2 बारीक चमचा हळद
 • 1 टेबलस्पून हिरवी मिरची कापलेली
 • 1 टेबलस्पून बारीक चिरलेले कोथिंबीर
 • 1 चवीनुसार मीठ
 • 1/2 चमचा तिखट

पनीर भुर्जी बनवण्याची विधी:

पनीर भुर्जी बनवण्यासाठी एक कढई घ्या, त्यामधे तेल टाकून मध्यम गॅस च्या आचे वर गरम करा.

तेल गरम झाल्यावर जरा जिरं टाका, जीरा तडतडल्यावर त्या कढई मद्ये बारीक चिरलेला कांदा टाकावे. मध्यम आच च्या गॅसवर 1 ते 2 मिनिट चांगले शिझवा.

आता त्या कढई मद्ये 2 टेबलस्पून पाणी आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून गॅस च्या आचेवर गरम करा.

मिश्रण नीट हलवत रहा ध्यान ठेवा. आता मिश्रण शिजल्या नंतर त्या कढई मद्ये हळद, पावभाजी मसाला, हिरवी मिरची, 1 टेबलस्पून पाणी, आणि स्मॅश केलेले पनीर टाकून नीट मिक्स करा.

आता गॅस मंद आचे वर ठेवा, आणि 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घ्या.

तुमची पनीर भुर्जी तयार आहे, एक थाळी घ्या आणि त्यामधे जरा भाजी घालून रोटी किंवा पोळी सोबत खावा.

प्रो टिप्स:

 • पनीर भुर्जी बनवत असताना गॅस मध्यम आचे वर ठेवा.
 • पनीर भुर्जी बनवत असताना पनीर फ्रेश वापरा.

Related posts

Leave a Comment