Panipuri recipe in Marathi | पाणीपुरी रेसिपी

Panipuri recipe in Marathi: पाणीपुरी ही सर्वांना आवडणारी गोष्ट आहे, आज प्रत्येकाला ह्याचा स्वाद माहीत असेल पण रेसिपी माहीत नसेल. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही डिश भरपूर फेमस आहे. प्रतेक पाणी पुरी लवर ने पाणी पुरी ही फक्त गाडीवर किंवा हॉटेलमधे खाल्ली असेल. पण गाड्यावर खाल्याने आपल्याला काही आजार ही होऊ शकतात. कारण आपल्याला माहीत नाही पाणीपुरी गाड्यावरील दुकानदार कोणते पाणी त्या पाणीपुरी मद्ये वापरत असेल. 

तर ह्या साठीच मित्रानो, पाणीपुरी घरी बनविणे हा ऑप्शन खुप फायदेशीर ठरतो. आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून पाणीपुरी घरी अगदी सोप्प्या गोष्टींनी व लवकर कशी बनते हे शिकून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आपल्या Pani Puri recipe in marathi at home.  

Pani puri Recipe

Pani Puri Recipe in Marathi

Pani Puri puri recipe in marathi पाणीपुरी पुरी 

पाणीपुरी पुरी बनवण्याचे साहित्य 

 • 3 वाटी बारीक किंवा साधा रवा 
 • 1 चमचा पीठ मोळण्यासाठी तेल 
 • 1 चमचा मीठ

कृती :- 

Pani prii recipe in marathi: पहिला एक भांडे घ्या त्यामधे आपण घेतलेला रवा आणि मीठ घाला व त्याला मिक्स करा. तेल गरम करून त्या भांड्यात रवा आणि मिठासोबत मिक्स करा. थोड्या वेळाने त्या मिक्स मद्ये पाणी घालत जावा. जसे जसे तुम्ही पाणी घालत जाल ते पीठ घट होईल व आपण जसे चापतीचे पीठ बनवतो तसे होईल. 

पीठ तयार झाल्यानंतर एका साइडला 15 मिनटांसाठी त्याला झाकून ठेवून द्या. दुसरी कढई घ्या व त्यात तेल टाकून ते कढई गॅस वर ठेऊन द्या. तेलाला थोड गरम होवुद्या, गरम झाल्यावर एका छोट्या वाटीने किंवा बॉटल च्या झाकणाने पुरी बनवून तेलात तळून घ्या. आता तुमच्या घरगुती पद्धतीने बनवलेले पुऱ्या तयार आहेत, आता आपण पाणी कसे बनवतात ते बघुया. 

पाणीपुरीचे तिखट पाणी: 

तिखट पाणीसाठी लागणारे साहित्य:- 

 • एक वाटी हिरवेगार पुदिना 
 • एक वाटी कोथिंबीर 
 • 5 पाकळ्या लसूण 
 • 4 मिरच्या 
 • 2 इंच आल
 • 2 चमचा मीठ 
 • 1 चमचा जिरे पावडर 
 • 1 चमचा चाट मसाला 
 • 1 चमचा धणेपूड 

कृती:- 

आपण घेतलेले कोथिंबीर, आल, पुदिना आणि लसूण मिक्सर मद्ये मिक्स करून घेणे. ते मिक्स एका गळणीच्या साह्याने नीट गाळून घ्यावे, व एका भांड्यात काढावे. आता त्या भांड्यामधे नंतर सर्व मसाले जसे मीठ, जिरेपूड, धणेपूड, चाट मसाला घालून त्याला मिक्स करावे. जर तुम्हाला आवडत असेल तर त्या पाण्यामधे थोडे बुंदी टाकावे. 

Panipuri Pani recipe in marathi गोड पाणी: 

गोड पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 

 • 1 वाटी चिंच 
 • 1 आणि अर्धा वाटी गूळ किसून बारीक 
 • 1 चमचा जिरेपूड 
 • 1 चमचा धणेपूड 
 • अर्धा वाटी खजूर 
 • 1 चमचा मीठ चवीनुसार 
 • 1 चमचा लाल तिखट 

कृती:- 

चिंच, गूळ आणि खजूर 6-7 तास आधीच पाण्यात भिजवून ठेवणे गरजेचे आहे. नंतर एका भांड्यात हे घालून त्यात थोड पाणी मिक्स करून गॅस वर ठेवून द्यावे. किमान 15 ते 20 मिनिटांसाठी भांडे गॅसवर ठेवावे. थोड्यावेळाने त्या मिक्स ला गाळणीच्या साह्याने गाळण करून दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे. मग आता त्यात राहिलेले सर्व मसाले घालून मिक्स करावे. जसे जिरेपूड, धणेपूड, मीठ आणि लाल तिखट. 

पाणी पुरी तयार झाल्यावर, रगडा किंवा बटाटा बनविण्यासाठी टिप्स

साहित्य:- 

 • 4 बटाटे 
 • 1 चमचा जिरेपूड 
 • 1 चमचा हळद 
 • 1 चमचा मीठ 

कृती:- 

वर दील्यापैकी बटाटे हे कुक्करला लावावे, व नंतर बटाटे थंड झाल्यावर त्याला मळून त्यात मसाले टाकावे. जसे जिरेपूड, हळद आणि मीठ आणि त्याला मिक्स करावे. 

Related posts

Leave a Comment