How to make potato chips at home | Batata chips recipe in Marathi

बटाटा चिप्स सर्वांना खूप आवडतात पण कसे बनवतात हे सर्वांना माहीत नसेल, तर आज आम्ही तुमच्या सोबत बटाट्याचे चिप्स कसे बनवतात हे शेअर करणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा.

How to make potato chips at home | Batata chips recipe in Marathi

बटाटे चिप्स हे खाण्यात नमकीन आणि स्वादिष्ट लागतात. बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी साधे बटाटे नाही वापरले जातात, त्यासाठी वेगळे चिप्स बनविण्यासाठी केले जाते.

बटाट्याचे चिप्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य: –

  • 2 किलो बटाटे
  • पाणी
  • 4 छोटे चमचे मीठ
  • 1/2 लिंबाचे तुकडे

बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी कृती:

  1. बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम बटाटे धुवून घेऊन त्याचे वरचे साल काढून पाण्यात भिजवण्यास ठेवून द्यावे.
  2. आता 2 तासाने हे बटाटे नीट चिप्स च्या आकारांचे कट करून घ्यावे.
  3. आता हे कट केलेले बटाट्याचे चिप्स पाण्यात टाका आणि चांगले धुवून घ्या परत. आता एक भांडे घ्या आणि त्यामधे पाणी आणि मीठ टाकून मध्यम आचेवर गॅस वर गरम करण्यास ठेवून द्यावे.
  4. आता 5 मिनिटांनी पाणी उकळायला लागेल, पाणी उकळायला लागल्यावर हे बटाट्याचे तुकडे त्यात टाकून ते भांडे झाकून 5 मिनिटांसाठी गॅस वरतीच ठेवावे.
  5. 5 मिनिटांनी बटाट्याचे तुकडे त्या भांड्यातून काढून एका कापडावर ठेवून नीट स्वच्छ करून घ्यावे किंवा उन्हात कोरडे होण्यास ठेवून द्यावे.
  6. आता आपले बटाटे चिप्स तयार आहेत, आता एक कढई घ्या आणि त्यामधे तळण्यासाठी तेल टाकून गॅस वर गरम करण्यास ठेवावे. तेल गरम होताच बटाट्याचे चिप्स तळून घ्यावे.

Related posts

Leave a Comment