नाचणी सत्त्व – Ragi Malt

नाचणी हे आपल्या संस्कृती मधील सर्वात पोषक मसाले घटकांमधील एक आहे. आजही गावाकडे लोक नाचणी चे भाकरी खातात. नाचणीचे पोषक गुण वाढतात जेव्हा नाचणीला नीट मोड येते तेव्हा. म्हणून आजही गावाकडे नाचणीला पहिला मोड आणून नंतर त्याच पीठ करून मग भाकरी तयार केली जाते. यामुळे ते बनवलेले भाकरी देखील आपण काही वेळा नंतर खाहू शकतो, त्यातील पोषक गुण संपत नाही. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

नाचणी सत्त्व बनवण्यासाठी लागणारी सामग्री:

 • मोड आलेली नाचणी
 • नाचणी धुण्यासाठी पाणी

नाचणीला मोड कसे आणावेत? How to sprout ragi or finger millet

 1. नाचणी ला मोड आणण्यासाठी देखील एक वेगळा मार्ग आहे जर नीट हा मार्ग आपण फॉलो नाही केला तर मग नाचणीला नीट मोड येत नाही. नाचणीचे गुण वाढविण्यासाठी नाचणीला मोड आणावे लागेल.
 2. आपल्याकडे असलेली नाचणी सर्वात पहिला नीट स्वच्छ चाळून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
 3. नाचणी नीट धुवून झाल्यावर एक भांडे घ्यावे ज्यामधे नाचणी मावेल, त्यामधे पाणी आणि नाचणी टाकून हे नाचणी 6 ते 8 तासांसाठी भिजत ठेवा.
 4. 6 ते 8 तासांनंतर नाचणी जर थोडीशी फुलली असेल तर मग एक स्वच्छ कापड घ्यावे आणि त्या कापडामध्ये नाचणी नीट बांधून ठेवावे. लक्षात घ्या जास्त घट्ट बांधून ठेवू नका.
 5. किंवा जर तुमच्या कधे वेताची टोपली अर्थात पर्धी असेल तर त्यामधे एक कापड पसरून त्यावर मग भिजवलेली नाचणी घालून हलक्या हाताने पसरून घ्यावे. म्हणजे सगळे नाचणीचे दाने वेगवेगळे राहतील. आता या टोपलीवर, एक ताट घ्यावे आणि झाकून ठेवावे.
 6. लक्षात ठेवा नाचानीला नीट मोड येण्यासाठी उबदार वातावरण हे गरजेचे आहे म्हणून ह्या टोपलीला कुठेतरी उबदार परिसरात ठेवा. जसे की टेबल खाली किंवा किजोरी मधे.
 7. 11 ते 12 तासांमध्ये तुम्हाला नचानिमध्ये मोड आलेले दिसतील, आणखी 3 तासांनी तुम्हाला नीट मोड आलेले दिसतील. हे मोड वापरण्यासाठी योग्य आहेत. तर आता तुम्ही टोपली वरील कापड काढू शकता.

लक्षात घ्या हे मोड आलेली नाचणी तुम्ही बंद भांड्यात फ्रिज मधे 7 दिवसांसाठी ठेवू शकता.

नाचणी सत्व बनवण्याची कृती:

 1. नाचणी ला मोड आल्यानंतर ही मोड आलेली नाचणी घ्या आणि एक ताट घ्या. त्या ताटात ही नाचणी पसरवून घ्या आणि सावलीत साधारण 6 ते 8 तासांसाठी वाळवयाला ठेवून द्यावे.
 2. 6 ते 8 तासांमध्ये मोड आलेली नाचणी कोरडी होऊन जाईल. आपल्या हातानेच नीट पसरवून घ्यावे म्हणजे नाचणी चे दाने वेगवेगळे राहतील.
 3. आता एक जाड भांड घ्यावे ही नाचणी भाजण्यासाठी. त्या भांड्यात ही नाचणी टाकून मध्यम आचेवर गॅस ठेवून नीट नाचणी भाजून घ्यावे. नाचणी भाजत असताना सारखा चमचा चालवत रहा किंवा ढवलात रहा.
 4. नाचणी चा भाजका वास आला की लगेच गॅस बंद करावे आणि ते भांड साईड ला ठेवावे.
 5. नाचणी ला मिक्सर मधे दळणे अवघड आहे जास्त वेळ लागेल मिक्सर मधे दळण्यासाठी. बाहेरून दळून आणणे सोप्पे आहे.
 6. हे मोड आलेले नाचणी चे पीठ म्हणजेच ‘नाचणी सत्त्व’. ह्या नाचणी सत्वा पासून तुम्ही खूप पोष्टिक पदार्थ बनवू शकता. जसे नाचणी ची भाकरी.

Related posts

Leave a Comment