रव्याचे लाडू रेसिपी मराठी | Ravyache Ladu Recipe in Marathi

रव्याचे लाडू हे सर्व वयाच्या माणसानं साठी अत्यंत स्वादिष्ट आणि चांगली डिश आहे. रव्या मद्ये खूप पोषक तत्व असतात. त्यामुळे हे डिश हेअल्धी देखील आहे. महाराष्ट्रात सन असो जसे दिवाळी किंवा दसरा किंवा कोणता सन नसो तरी रव्याचे लाडू केले जातात. आता गणपती बाप्पा येणार आहेत तर रव्याचे लाडू एक बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्या प्रसादासाठी. लाडू खूप प्रकारचे आहेत जसे बेसन आणि बुंदी चे पण असतात पण सर्वात बेस्ट हे रव्याचे लाडू वाटतात आम्हाला.

महाराष्ट्रात जास्त प्रमाणात सन साजरे केले जातात, त्यात दिवाळी आणि नवरात्र खूप फेमस आहे. नवरात्र आणि दिवाळी मद्ये किंवा असेच बनवायला रव्याचे लाडू हे खूप चांगले पदार्थ आहे. जसे हे पदार्थ खाण्यास गोड आणि स्वादिष्ट आहेत तसेच बनवण्यासाठी देखील तेवढेच सोपे आहे. जर तुमच्या घरी कोणते पाहुणे आहे किंवा मुलांसाठी संध्याकाळी स्नॅक्स साठी रव्याचे लाडू हा पदार्थ बेस्ट आहे. आणि हे पदार्थ घरी असलेल्या सामानाने देखील आपण बनवू शकतो.

जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर मग तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना ही रेसिपी शेअर करा. आणि जर तुमच्या कडे आमच्या साठी काही सगेशन्स असतील तर आमच्या सोबत शेअर करा आम्ही त्यावर काम करू.

आज आपण ह्या पोस्ट क्या माध्यमातुन “रव्याचे लाडू रेसिपी/ रवा लाडू रेसिपी मराठी/ रवा लाडू” बद्दल माहिती घेणार आहोत. रव्याचे लाडू बनविणे अत्यंत सोपे आहे हे घरात असलेल्या समनाने देखील आपण बनवू शकतो.

जर तुम्हाला रव्याचे लाडू बनवायचे आहेत, तर खाली दिलेल्या लागणारे साहित्य आणि लाडू बनविण्यासाठी कृती ला फॉलो करा. रव्याचे लाडू बनविणे अत्यंत सोपे आहे जर तुम्ही लेख स्पष्ट पणे वाचला असेल तर. जर लेख वाचून पण तुम्हाला काही प्रोब्लेम आला ते आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू. तर मग चला बगुयात कसे बनवतात रव्याचे लाडू.

रव्याचे लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य

रव्याचे लाडू बनविण्यासाठी तुम्हाला पुढील साहित्य लागतील:

  • 5-6 चमचे तूप
  • 3 कप बारीक रवा
  • 2 वाटी पाणी
  • 2 वाटी साखर
  • 3 चमचे इलायची पावडर
  • 3 चमचे द्रायफुड पावडर
  • सजविण्यासाठी किशमिष (ऑप्शनल आहे)

रव्या चे लाडू बनविण्यासाठी कृती

वरील सर्व साहित्याने आपण बेस्ट आणि स्वादिष्ट रव्याचे लाडू बनवणार आहोत. कृती फॉलो करण्याआधी चेक करा तुमच्या कडे सर्व साहित्य उपलब्ध आहे की नाही, जर नसेल तर शेजारील मार्केट स्टोअर मधून घेऊन यावे. चला मग बनवूया आपले रव्याचे लाडू.

सगळ्यात पहिल्यांदा एक कढई घ्या, त्यामधे तूप टाकून गॅस वर मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी गरम हाउद्या व नंतर तूप गरम झाल्यानंतर त्यामधे बारीक रवा टाकावे व 10 मिनिटांसाठी नीट भाजून घ्यावे. तुम्हाला 5 मिनिटात रव्याचा आणि तुपाचा सुगंधी वास येऊ लागेल. रवा भाजंताना काही महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्या, रवा खाली भांड्याला चिकटू नये याची काळजी घ्या. जर रवा खाली भांड्याला चिटकले तर मग ते करपून जाईल. करपल्या नंतर लाडूचा टेस्ट खूप खराब होईल. जास्त वेळ देखील रव्याला भाजू नये.

आजुन एक गोष्ट, भाजत असताना लक्ष्य द्या की रव्याचे रंग बदलू नये. रव्याचे रंग वेग वेगळे असले तर मग तस्ते मद्ये फार फरक येतो. म्हणून मध्यम आचेवर ठेवून नीट हलवत हलवत रवा भाजावा. ज्यकरून रव्याचे रंग ही बदलणार नाही. रवा जरासा गोल्डन दिसू लागला तर मग गॅस बंद करून घ्यावे. आणि रवा साईड ला काढून ठेवावे.

हे रवा आणि तुपाचे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर च्या जार मद्ये घ्यावे रवा बारीक करण्यासाठी. रवा बारीक असल्याने अजून जास्त टेस्ट येतो लाधुला. जर तुम्हाला ही स्टेप स्किप करायची आहे ते तुम्ही नक्की ही स्टेप स्कीप करू शकता. काहीच फरक नाही पडणार. पण रवा मात्र बारीक असणे गरजेचे आहे कारण बारीक रव्याने रव्याच्या लाडू ला चांगले टेस्ट येते. जर तुम्हाला मिक्सर ला रवा लावायचा नसेल तर मग आधीच रवा बारीक वापरा जाध वाला रवा वापरू नका.

आता नेक्स्ट स्टेप म्हंजे चाचणी बनविणे रव्याच्या लाडुसाठी. चाचणी बनविण्या साठी एक भांडे घ्या, त्या भांड्यात 3 ते 4 वाटी साखर टाका आणि 1 ग्लास पाणी टाका. आपल्याला साखरेचे पाक बनव्याचे आहे ह्या हिशोबाने पाणी तुम्ही जास्त कमी करू शकता. 3 ते 4 मिनिट त्याला असेच मिसळत रहा. 4 मिनिटांनी भांड्याला गॅस वर ठेवा आणि 5 ते 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर गरम करा. 10 मिनिटांनी चेक करा साखरेचं पाक तयार आहे की नाही. जर पाक तयार असेल तर गॅस बंद करून साईड ला ठेवून द्या.

रव्याचे लाडू बनविण्यासाठी सर्वात महत्वाचे हे त्या साठी लागणारे पाक म्हंजे चाचणी असते. जर चाचणी जरा जरी नीट झाली नसेल तर रव्याच्या लादुमधे भरपूर फरक जाणवतो. जर तुम्हाला तुमचे रव्याचे लाडू टेस्टी आणि जास्त कालावधी साठी हवे असतील तर मग तुम्हाला चाचणी म्हंजे पाकची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून पाक सविस्तर रीत्याने नीट बनवा.

आता आपल्याला हा साखरेचा पाक नीट तयार झाला आहे की नाही हे चेक करायचा आहे, चेक करण्यासाठी ही गोष्ट लक्ष्यात घ्या की पाक चेक करण्यासाठी कधीही गरम साखरेचा पाक घेऊ नये. कारण जेव्हा पाक गरम असते तेव्हा त्याचे गुण वेगळे असते व जेव्हा पाक थंड असते तेव्हा वेगळे असते.

म्हणून पाक चेक करण्यासाठी पाक थंड झाल्यावर ते पाक घ्यावे. आता जर पाक थंड झाले असेल तर त्या पाकमधील चीमुठभर पाक आपल्या हातावर घेऊन ते आपल्या हातातील कोणत्याही दोन बोटांच्या मधी ठेवून बोट हलवून बघावे, जर बोटांच्या मद्ये जरा सां चिकट पण असेल तर मग हे पाक तयार आहे रव्याचे लाडू बनविण्यासाठी. आणि जर बोटांच्या मद्ये चिकट पण नसेल तर लाडू बनणार च नाही. आणि जर चिकट पण जास्त असेल तर लाडू खूप कड्क होतील.

पाक थंड करण्यासाठी संपूर्ण पाक थंड करू नये, जर तुम्ही पाक थंड केला असेल तर मग नंतर परत पाकला गरम करून त्यात थोड पाणी टाकावे. पाक गरम झाल्यावर ह्यात द्रायफुट पावडर आणि इलायची पावडर टाकावे.

आता पाकमध्ये रव्याचे बनवलेले मिश्रण टाकावे आणि नीट मिक्स करावे. आणि नंतर थोडे गरम असतानाच लाडू बनवून घ्यावे. नीट लाडू बनवा आणि थोड्यावेळाने लाडू थंड होण्यासाठी ठेवून द्या.

आता हे लाडू तुम्ही 20 ते 25 दिवसांसाठी तुम्ही वापरू शकता.

Related posts

Leave a Comment