समोसा रेसिपी मराठी | Samosa Recipe in Marathi

समोसा म्हंटले की प्रत्येकाला तोंडात पाणी येते, समोसा हे मैदा आणि बटाट्याच्या मिश्रणाचे बनवले जाते. पहिले बटाट्याचे मिश्रण बनवून त्यावर मैदा लावून तलले जाते समोसा. समोसा हे जास्त करून चहा सोबत खाल्ले जाते. समोसा भारतातील बेस्ट आणि स्वादिष्ट फास्ट फूड आहे.

आम्ही घरी खूप वेळा समोसा करून खाल्ला आहे. जसे कधी कोणाचा बडे असला, तर कधी कोण पाहुणे आले तर समोसा बनवणे हे कायम ठरले आहे. समोसा खायला देखील खूप टेस्टी आणि सर्वात सोप्प्या रित्या होणारे रेसिपी आहे.

समोसा रेसिपी मराठी

लगणात किंवा कोणत्याही कार्यक्रमात देखील समोसा हे खाण्याचे आयटेम ठरलेले असतेच. आज जवळपास भारतात असणाऱ्या सगळ्या हलवाईच्या दुकानात समोसा विकण्यासाठी असते. समोसा हे आताच ट्रेंड ला आलेले फास्ट फूड नाही आहे, हे खूप काळापासून शतकापासून खाल्ले जात आहे.

समोसा आणि फूड लवर्स च नात्त खूप फेमस आहे. 2010 पर्यंत समोस्याची किंमत 5 रुपये होती, आज 15 रुपये लाही समोसा नाही भेटत आहे. समोसा आहे तोच आहे वाढलाय तर फक्त महागाई. समोसा जास्त करून लाल टोमॅटो सॉस सोबत खाल्ले जाते तर कधी कधी पुदिना किंवा चिंचा च्या चटणी सोबत खाल्ले जाते.

हलवाई सारखे समोसा घरी बनविणे खूप सोपे आहे, आणि घरी असलेल्या साहित्य सोबत समोसा बनविले जाते. समोसा बनविण्यासाठी मेन मैदा, बटाटा, आणि आल लसूण पेस्ट लागतय.

मला आजही लक्षात आहे 2008 साली आमच्या घराजवळ दररोज सकाळी एक काका यायचे, आणि ते 2 रुपय वाले समोसा आणायचे. त्या समोस्यांचा टेस्ट मला आजही लक्षात आहे. तेव्हा आम्ही 10 किंवा 20 रुपयांमध्ये 5 ते 10 समोसे घायचो. खायला देखील खूप स्वादिष्ट होते ते समोसे. जसे जसे टाईम निघत गेला तसे तसे त्या समोस्यांच्ची रक्कम देखील तेवढेच वाढत गेले. आणि आज तो समोसा 15 रुपयांचा आहे. त्या काळी 16 रुपये मद्ये 8 समोसे यायचे तर आज फक्त एकच समोसा येईल एवढ्या मद्ये. जाऊदे पण मला आज पर्यंत त्या वेळे सारखं टेस्ट च समोसा आज पण नाही भेटलं.

आज जसे समोस्या चे रेट वाढले आहे तसे आज समोस्यांमधे प्रकार देखील वाढले आहे. समोसा बनवण्यासाठी खूप काही लागत नाही तुम्ही देखील घरी हलवाई सारखं समोसा बनवू शकता.

समोसा बनवण्यासाठी लागणारी सामग्री:

 • 2 कप मैदा
 • 1 टीस्पून ओवा
 • 1 टेबलस्पून तूप
 • 3 उकडलेले बटाटे
 • 1/2 कप मटार चे दाने
 • चवीनुसार मीठ
 • 1 इंच आल्याचे तुकडे
 • 4-5 हिरव्या मिरच्या
 • 1/2 कप बारीक चिरलेले कोथिंबीर
 • 2 टेबलस्पून तेल
 • 2 बारीक चमचे बडीशुप बारीक कुटून
 • 2 छोटे चमचे जीरा
 • 2 छोटे चमचे धने बारीक कुटून
 • 1 छोटा चमचा हिंग
 • 1 छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
 • 2 छोटे चमचे धणे पावडर
 • 2 छोटे चमचे गरम मसाला पावडर
 • 1 छोटे चमचा आमचूर पावडर
 • 1 छोटा चमचा चाट मसाला
 • 1 छोटा चमचा साखर
 • 2 छोटे चमचे बारीक तुकडे करून काजू
 • 2 छोटे चमचे मनुके कट केलेले

समोसा बनवण्याची प्रक्रिया:

 • समोसा बनवण्यासाठी आपण पहिला समोस्याचे बाहेरील आवरण बनवून घेवूत, पहिला एक परात किंवा ताट घ्या. त्यामधे मैदा, चवीनुसार मिठ आणि ओवा टाकून नीट मिक्स करून घ्यावे. मिक्स केल्यानंतर तूप कडवून ह्या मिश्रण मद्ये नीट मिसळून घ्यावे. तुपाने समोसे खुसखुशीत होतात. तूप नीट पिथासोबत मिसळून घ्यावे.
 • आता ह्या मिश्रण मद्ये थोडे थोडे पाणी टाकून ह्याचे पिठाचे गोळे बनवून घ्यावे जसे आपण चपाती साठी बनवतात तसे. पीठ मळल्या नंतर ह्या पिठाला 25 ते 30 मिनिटांसाठी नीट झाकून ठेवावे. ह्याच्याने समोसे तळत असताना तेलामध्ये सुटणार नाहीत.
 • आता एक नॉनस्टिक पॅन घ्यावे आणि त्यामध्ये २ टेबलस्पून तेल मध्यम आचेवरील गॅस वर गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यामधे जिरे आणि हिंग घालून त्याला नीट तडका द्यावा. आता त्या पॅनमधे बडीशेप आणि धणे घालून 1 मिनिट भाजून घ्यावे.
 • 1 मिनिट झाल्यानंतर आता मटारचे दाणे पॅनमधे घालावे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी हे नीट मिक्स करून घ्यावे. लक्षात घ्या जर मटारचे दाणे फ्रेश असतील तर 3 ते 4 मिनितांपर्यंत भाजावे.
 • आता आल लसूण आणि हिरवी मिरची चे पेस्ट घालून तेही 2 मिनिटांसाठी नीट मिक्स करून घ्यावे.
 • आता वेळ आहे सगळे मसाले घालण्याची, मसाले म्हणजे लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, आणि चवीनुसार मीठ पॅनमधे घालून छान मिक्स करून घ्यावे. लक्षात ठेवा मसाले करपू नाहीत म्हणून मधी मधी 2 टेबलस्पून पाणी टाकत राहावे.
 • जर तुम्हाला तिखट खाणे आवडत असतील तर लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार वाढवू शकता. जर समोसे मुलांसाठी बनवत आहे तर वाढवू नका राहूदे मग.
 • हे मिश्रण 3 ते 4 मिनिट शीझवून घ्यावे, 3-4 मिनिटांनंतर त्या मिश्रण मद्ये थोडे साखर घालून छान मिक्स करून घ्यावे. मिश्रणामध्ये साखर घातल्याने समोष्याना टेस्ट चांगले येते.
 • साखर घातल्यानंतर त्यामधे आपण उकडलेले बटाटे कुस्करून टाकून नीट मिक्स करून घ्यावे. मिक्स करून घेतल्यावर ह्या मिश्रण मद्ये काजू आणि मनुके घालून घ्यावे.
 • आता ह्या मिश्रण मद्ये चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आमचूर पावडर घालून मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी नीट शिजवून घ्यावे.
 • आता 3-4 मिनिटांनी सामोस्याचे सरण तयार आहे, मग गॅस बंद करावे आणि हे सरण दुसरीकडे थंड व्हायला ठेवावे.
 • आता आपण समोस्याचे बाहेरील आवरण बनवूया, आपण थंड होण्यासाठी ठेवले होते ते पीठ नरम झाले असेल 30 मिनिटांनी. आता त्या पिठाचे 3 भाग करून घ्यावे. प्रतेक भागाचे एक गोल रोटी सारखे लाटनाच्या सहायाने लाटून घ्यावे.
 • नीट तेल लावून चपाती बनवतो तसे लाटून घ्यावे, कारण ह्या पिठवरून आपले समोसे कशे होतील हे ठरतो.
 • आता एक वाटी मद्ये पाणी घ्यावे, समोस्यचे बनवलेले सारण आणि हे पीठ जवळ घ्यावे. आणि एक चाकू देखील घ्यावे. चाकूच्या सहायता ने बनवलेल्या पारी चे 2 समान अर्धे भाग करून घ्यावे. जिथे आपण कापले आहे तिथे सरळ रेषेत नीट पाणी लावावे. आणि ते 2 कडे छान एकमेकांवर चिकटून एक कोन बनवून घ्यावे (पाणी लावण्याने समोसा तेलामध्ये सुटणार नाही).
 • आता बाकी पिठाचे देखील असेच कोन बनवून घ्यावे, आता हे बनवलेल्या कोना मद्ये 1 ते 1.5 टेबलस्पून समोष्याचे सरण घालून जी परीची मोकळी बाजू आहे तिला देखील नीट पाणी लावून त्या बाजूला वरच्या बाजूस चिकटून द्यावी. अशेच सगळ्या पिठाचे समोसे बनवून घ्यावे. ही स्टेप खूप महत्वाची आहे त्यामुळे ही स्टेप नीट लक्ष देऊन करा.
 • आता आपल्याला फक्त समोसे तळायचे आहे, समोसे तळण्यापूर्वी बनवलेले समोसे मोकळ्या वातावरणात 10 ते 12 मिनिटांसाठी ठेवावे जेणेकरून तळत असताना समोष्यान मधून बुडबुडे नाही येणार.
 • 10 मिनिटांनी आपले समोसे टाळण्यासाठी तयार आहेत, एक कढई घ्यावी त्यामधे समोसे पूर्ण तळतील तेवढे तेल घालून मध्यम आचेवरील गॅस वर ठेवावे. जसे तेल गरम होईल तेव्हा तुम्ही समोसे तळून घेऊ शकता. समोसे चांगले चॉकलेटी म्हंजे ब्राऊन कलर चे होऊ पर्यंत तळत रहा.
 • आता तुमचे समोसे तयार आहेत, जर तुम्हाला तळलेली मिरची सामोस्या सोबत आवडत असेल तर ते देखील तुम्ही खावू शकता. ह्या समोष्याणा लाल टोमॅटो केचप किंवा पुदिनाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

Related posts

One Thought to “समोसा रेसिपी मराठी | Samosa Recipe in Marathi”

Leave a Comment