गोडा चा शिरा बेस्ट मराठी रेसिपी

महाराष्ट्र असो किंवा दुसरा कोणता तरी राष्ट्र, सर्वात फेमस आणि स्वादिष्ट आणि हिअल्धी मिठाई म्हंटले की पहिला नाव शिरा चे च येते. शिरा हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे सर्वात बेस्ट रेसिपी आहे जी आपण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात किंवा घरी पाहुणे आल्यावर त्यांच्या साठी करतो.

 गोडा चा शिरा बेस्ट मराठी रेसिपी

आज ह्या पोस्ट च्या द्वारे आम्ही तुमच्या सोबत शिरा कसे बनवतात याची बेस्ट मराठी रेसिपी शेअर करत आहोत, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना रेसिपी नक्की शेअर करा. शिरा हा सर्वात लवकर आणि काही गोष्टींनी तयार होणारा पदार्थ आहे.

शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • 1 कप रवा
 • 1/2 कप गरम दूध
 • 1/2 कप तूप
 • 2.5 कप गरम पाणी
 • 1 टीस्पून चिरलेला मनुका (किसमीस)
 • 1 कप साखर
 • 1 टीस्पून चिरलेला काजू (काजू)
 • 1 टीस्पून वेलची पूड (इलायची पावडर)

शिरा बनवण्यासाठी कृती:

 1. रव्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वात पहिला एक कढई घ्या आणि त्या मधे आर्ध कप तूप टाकून मध्यम आचेवर गॅस वर ठेवून द्या. तूप गरम होताच त्यामधे रवा टाकून 5 ते 6 मिनिटांसाठी नीट मिक्स करून घ्यावे.
 2. मिक्स करताना तुम्हाला रव्याचा खमंग वास येऊ लागेल. आता आपण चिरलेले बेदाणे किंवा काजू टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
 3. आता दूध टाकून नीट 5 मिनिटांसाठी हलवत मिक्स करून घ्या. आता कढई मधे साखर टाकून कढई वर झाकून 10 मिनिटांसाठी गरम होण्यास मध्यम आचेवरिल गॅस वर ठेवून द्यावे.
 4. 10 मिनिटांनी झाकण काढून कढई मधे वेलची म्हणजे इलायची पावडर टाकून नीट 1 मिनिटांसाठी मिक्स करून घ्यावे.
 5. आता तुम्हाला शिऱ्या चा खमंग वास येऊ लागेल, आपला शिरा तयार आहे. गॅस बंद करून 2 मिनिटांसाठी कढई थंड होऊ द्या किंवा तुम्ही हा शिरा गरमा गरम सर्व्ह करू शकता.

Related posts

Leave a Comment