कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा रेसिपी | Tambda Pandhra Recipe in Marathi

कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा रेसिपी

कोल्हापूर म्हणजे मासल्यांच शहर, संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापुरी मसाले खूप फेमस आहेत. मग त्यात जर गोष्ट कोल्हापुरी चिकन किंवा मटण असेल तर त्यासोबत आपल्याला तांबडा पांढरा रस्सा देखील दिला जातो. जे खाण्यासाठी खास लोक वेग वेगळ्या जिल्ह्यातून कोल्हापूरला जाणं पसंद करतात.

कोल्हापुरी मिसळ सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा देखील भरपूर फेमस आणि स्वादिष्ट आहे. कोल्हापूर आणि त्याच्या जवळील काही किल्ले वगळता बाकी जील्यांमधे कोल्हापुरी तांबडा किंवा पांढरा रस्सा नाही मिळत. तुम्हाला रस्सा प्यायला मिळाला तरी त्याची टेस्ट कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्यासारखी नसते.

कोल्हापुरी तांबडा रस्सा पांढरा रस्सा

भरपूर लोकांना कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा फार आवडतो. जर तुम्हाला ही चिकन किंवा मटण खान आवडत असेल तर नक्की तुम्हाला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आवडेल.

आज ह्या पोस्ट च्या माध्यमातुन आम्ही तुम्हाला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा कशे बनवतात याची रेसिपी देणार आहे. जर तुम्हाला खाली दिलेली रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना नक्की शेअर करा.

पहिला मटण शिजवून घेवूयात

साहित्य:

 • 500 ग्राम मटण
 • 1 बारीक चिरलेला कांदा
 • 1/2 छोटा चमचा हळद
 • 1 मोठं चमचा आल लहसुण पेस्ट
 • 2 चमचे तेल
 • चवीनुसार मीठ
 • 3 कप पाणी

कृती:

 1. एक भांड घेऊन त्यामधे मटण नीट स्वच्छ करून घेणे.
 2. एक कुक्कर घ्या, मध्यम आचेवर गॅस वर गरम करायला ठेवा. आता कुकर मद्ये तेल टाका आणि तेल गरम झाल्यावर कांदा टाकून गुलाबी होऊ पर्यंत परतून घ्यावे.
 3. नंतर कुकर मद्ये आल लसूण पेस्ट आणि हळद घालावे आणि नीट मिक्स करून घ्यावे.
 4. आता त्या कुकर मद्ये स्वच्छ धुवून ठेवलेले मटण घालावे आणि कुकर झाकून ठेवून थोड्या वेळेसाठी मटण मधून पाणी सुटू पर्यंत वाफ येऊ द्या.
 5. आता कुकर मद्ये चवीनुसार मीठ घालून गरम पाणी घालून शिजायला ठेवणे. कुकर चे झाकण लावून 5 शिट्यांसाठी गॅस वर ठेवावे.

आता आपण पांढरा रस्सा बनवून घेऊया

साहित्य:

 • 8 ते 9 काजू
 • 2 चमचे तीळ
 • 1 छोटा चमचा जिरं
 • 2 वाटी नारळाचे घट्ट दूध
 • 2 लवंग
 • 2 मिरे
 • 1 तुकडा दालचिनी
 • 1 चक्रफुल
 • 2 तमालपत्र
 • 1 मोठं चमचा आल लसूण पेस्ट
 • चवीनुसार मीठ
 • 2 ते 3 हिरव्या मिरच्या
 • 2 मोठे चमचे तेल

कृती:

 1. पांढरा रस्सा बनवण्यासाठी, 8 ते 9 काजू गरम पाण्यात 1 ते 2 तासांसाठी भिजवून ठेवणे.
 2. एक भांड घेऊन त्यामधे तीळ आणि खसखस हलके भाजून घेणे.
 3. आता हे भाजलेले तीळ आणि खसखस आणि काजू ला मिक्सर जार मधे घालून पेस्ट बनवून घ्यावे. पेस्ट बनवण्यासाठी मधी मधी पाणी टाकावे.
 4. आता त्या कढई मद्ये तेल टाकून लवंग, मिरे, दालचिनी, हिरवी मिरची, आणि तमालपत्र घालावे आणि मिक्स करावे.
 5. आल लसूण पेस्ट घालून परत मिक्स करून घ्यावे. आता या कढई मद्ये बनवलेली काजू ची पेस्ट मिक्स करून घ्यावे.
 6. आता या कढई मद्ये नारळाचे दूध घालून त्यामधे मटण शिझवलेले पाणी घालून नीट मिक्स करून घ्यावे.
 7. चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करावे. हा तुमचा तांबडा पांढरा रस्सा तयार आहे.

मसाल्याचे वाटण करून तांबडा रस्सा कसा बनवायचा:

साहित्य:

 • 2 कांदे चिरलेले
 • 4 चमचे तीळ
 • 4 चमचे धणे पूड
 • 2 चमचा जिरं
 • 10 ते 15 लसूण पाकळ्या
 • 2 इंच आल
 • 2 तुकडे दालचिनी
 • 5 ते 6 मिरे
 • 5 ते 6 लवंग
 • 1 वाटी कोथिंबीर
 • 6 चमचे घरी बनवलेले लाल तिखट
 • कांदा लसूण मसाला
 • 1/2 चमचा हळद
 • मीठ चवीनुसार
 • 4 ते 5 मोठे चमचे तेल
 • 1 ओल्या नारळाचे किस

कृती:

 1. तांबडा रस्सा बनवण्यासाठी पहिला कांदा आणि खोबऱ्याचे किसला भाजून घ्यावे. त्यामधे नंतर तीळ, जिरं, लवंग, मिरी, दालचिनी आणि धने नीट भाजून घेणे.
 2. आता भाजून झाल्यावर एक मिक्सर चा जार घ्यावे आणि त्यामधे तीळ, जिरं, धने, दालचिनी, लवंग, आणी मिरी कोरडेच बारीक करून घ्यावे.
 3. आता त्यामधे खोबरे नीट बारीक करून घ्यावे. नंतर थोड्यावेळाने कांदा, आल लसूण पेस्ट आणि कोथिंबीर बारीक करून घ्यावे. ह्या मिश्रण मद्ये लागेल तेवढे पाणी घालून चांगले पेस्ट बनवून घ्यावे.
 4. आता एक मोठं कढई घ्यावे आणि त्यामधे 4 ते 5 चमचे तेल घालून गॅस वर गरम होण्यास ठेवून द्यावे. तेल थोडे गरम झाल्यावर त्यामधे घरचे लाल तिखट मसाला टाकावे. यामुळे रस्स्या ला रंग छान येईल आणि टेस्ट देखील स्वादिष्ट येईल.
 5. कढई मद्ये आता लगेच बनवलेला मसाला घालून नीट मिक्स करून घ्यावे. कढई मद्ये हळद घालून नीट मिक्स करून घ्यावे. आता त्यामधे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करत राहावे. आता हा झाला आपला तांबडा रस्सा तयार, जर तुम्हाला अजून रस्सा हवे असेल तर त्या मद्ये अजून पाणी घालावे.

सुक्क मटण कसे बनवतात

साहित्य:

 • सूक्क मटण बनवण्यासाठी पहिला आपण वरती बनवलेले मसाल्या मधील 2 ते 4 चमचे साईड ला काढून ठेवणे
 • 1/2 चमचा हळद
 • 1 बारीक चिरलेला कांदा
 • 4 ते 5 चमचे घरी बनवलेले लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • 1/2 वाटी बारीक चिरलेले कोथिंबीर
 • 3 ते 4 चमचे तेल

कृती:

 1. सुक् मटण बनवण्यासाठी एक कढई घ्यावे आणि त्यामधे तेल घालून मध्यम गॅस वर गरम होण्यासाठी ठेवून देणे.
 2. कढई मद्ये बारीक चिरलेला कांदा नीट परतून घ्यावे. कांदा परतून झाल्या नंतर त्या कढई मद्ये वाटलेला मसाला घालून ते देखील नीट मिक्स करून घ्यावे कांद्यासोबत.
 3. आता कढई मद्ये लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करून घ्यावे. मिक्स केल्या नंतर कढई मद्ये शिजवलेले मटण आणि चवीनुसार मीठ घालून शिझवणे.
 4. हे लक्ष्यात ठेवा मटण शिझवात असताना जास्त जोरात चमचा फिरवू नका, त्याच्याने मटणाचे तुकडे होतात.
 5. आता कढई मद्ये बारीक चिरलेले कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्यावे. हे आपल सक्क मटण देखील तयार आहे.

आता एक मोठे ताट घ्या, 2 वाटी घ्या एकामधे तांबडा तर एकमधे पांढरा रस्सा घाला आणि सुक्क मटण साईड ला वाढून बाजरी च्या भाकरी सोबत हे ताट सर्व्ह करावे.

जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना नक्की शेअर करा.

Related posts

Leave a Comment