Tandulaji Bhaji Recipe in Marathi – तांदुळजा भाजी

महाराष्ट्र म्हंटले तर मग वेग वेगळ्या प्रकार च्या भाज्या तर आल्याचं. त्यामधे जर तुम्ही गावाकड राहत असलास तर मग तुम्हाला वेग वेगळ्या पोष्टीक भाज्या आवडत असतील. त्या पैकी एक म्हणजे तांदुळाची भाजी आहे. ही एक पोश्टिक आणि सर्व शेतकऱ्यांना आवडणारी भाजी आहे. आणि जर तुम्ही ही भाजी कधी खाल्ली नसेल तर मग नक्की ट्राय करा ही भाजी शरीरा साठी फायदेशीर आणि सर्वात चांगली भाजी आहे. तर चला मग रेसिपी ला सुरुवात करुया. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

भाजी बनवण्यासाठी लागणारे वेळ: 5 ते 6 मिनिट

तयारी साठी वेळ: 1 मिनिट

tandulachi bhaji in marathi recipe

तांदुळाची भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

 • पाव किलो तांदूळ ची भाजी
 • 1 चोटे चमचा मोहरी
 • 1 छोटे चमचा जिरे
 • 4 पाकळ्या लसूण
 • 3 हिरव्या मिरच्या
 • तेल
 • चावीनुसार मीठ

कृती:

 1. तांदुळजी भाजी बनविण्यासाठी सर्वात पहिला ही भाजी घेऊन स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यावे. आणि नीट भाजी चिरून घ्यावे.
 2. आता लसूण आणि मिरची मिक्सर मधे घ्यावे आणि नीट पेस्ट बनवून घ्यावे. पेस्ट बनवलेले नीट साईड ला ठेवून द्यावे.
 3. आता एक कढई घ्यावे आणि त्यामधे तेल टाकून गॅस वर ठेवावे. आता मोहरी टाकून मोहरी फुटल्यानंतर कढई मधे जिरे टाकावे.
 4. जिरे तड तड ल्या नंतर आता कढई मध्ये बनवलेले मिरची लसूण पेस्ट घालावे. लगेच आता भाजी टाकून नीट मिक्स करून घ्यावे. आणि गॅस चा फ्लेम् वाढवा. आपण गॅस चा फलेम हा भाजी ला पाणी सुटू नये यासाठी करत आहे म्हणून नीट लक्ष देऊन ही स्टेप फॉलो करा.
 5. आता भाजी ला नीट परतून घ्या आणि 3 मिनिटांसाठी नीट भाजीला शिजुद्या.
 6. 3 मिनिटांनी भाजी मधे मीठ टाकून नीट भाजीला मिक्स करून घ्या.
 7. जेव्हा भाजितला सगळ पाणी निघून जाईल गॅस बंद करा आणि तुमची भाजी आता तयार आहे.
 8. तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करू शकता.

Related posts

Leave a Comment