वडापाव रेसिपी मराठी | Vada Pav Recipe in Marathi

वडापाव आज महाराष्ट्रातील सर्वात फेमस आणि स्वादिष्ट फास्ट फूडस पैकी एक आहे. वडापाव किती तरी दशकांच्या आदी पासून महाराष्ट्रात खाला जात आहे. वडापाव हे निर्माण करण्या पाठीमागे, माणसाची जेवणाची किंवा नाश्त्याची भूक लगेच संपेल हे होते.

आधी फक्त महाराष्ट्रात बटाटा वडा खाण्यात येत होता पण जस जस वेळ निघत गेलं तस त्यामधे बदल होत गेले. आज एक वेळच्या नाश्त्याची भूक भागवण्यासाठी आपण वडापाव खातो. जास्त करून महाराष्ट्रातील कर्मचारी वडापाव खाणे पसंद करतात. वडापाव दिसण्याला दोन पाव आणि मधे बटाटयाचा वडा असा असतो.

वडापाव रेसिपी मराठी

पण जास्त करून लोक बाहेरून वडापाव खाणे पसंद करतात कारण त्यांना घरी कसे बनवता येईल याची जाणीव नसते. बाहेर वडापाव कसे बनवतात हे आपल्याला माहीत नाही, बनवताना वस्तू चांगले वापरतात का हे देखील आपल्याला माहीत नाही. म्हणून वडापाव घरी बनवून खात जावा.

आज आम्ही ह्या पोस्ट च्या माध्यमातून तुमच्या सोबत बेस्ट वडापाव कसे बनवतात हे शेअर करणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना व घरच्यांना नक्की शेअर करा.

वडापाव सोबत खाण्यासाठी खूप पदार्थ येतात, जसे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी, पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचप. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वडापाव सोबत बनवून खाऊ शकता. वडापाव तळलेल्या हिरव्या मिरच्या सोबत खाण्यात वेगळीच मज्जा आहे.

Ingredients to make Vadapav recipe in Marathi (वडापाव बनविण्यासाठी लागणारे साहित्य):

 • 1 ते 2 पावलादी
 • ४ मध्यम उकडलेले बटाटे
 • 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
 • 3 ते 4 टेबलस्पून तेल वडे तळण्यासाठी
 • 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
 • 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 3 ते 4 कढीपत्ता
 • 1 लिंबू चा रस
 • फोडणीसाठी: २ चोटे चमचे तेल, 1 छोटे चमचे मोहोरी, 1 छोटे चमचे जिरे, जरा चिमूटभर हिंग, 1 छोटे चमचे हळद पावडर.
 • वडापाव चे पीठ: १ कप चणा किंवा बेसन पिठ, १ कप पाणी, 2 छोटे चमचे हळद पावडर, चवीनुसार मीठ, जरासा चिमूटभर खायचा सोडा.

खमंग कुरकुरीत बटाटे वडे बनवण्यासाठी कृती (Vadapav Recipe in Marathi Instructions):

 1. बटाटा वडा बनवण्यासाठी आपल्याला उकडलेले बटाटे पहले लागतात, म्हणून पाहिले 4 मध्यम बटाटे कुकर मद्ये 4 ते 6 शिट्या होईपर्यंत उकडून घ्यावे. बटाटे जर नीट उकडलेले असेल तर ते बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
 2. आता एक कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्यावे आणि त्यामधे 2 चमचे तेल टाकून मध्यम आचेवर गॅस वर गरम करण्यास ठेवून द्यावे. तेल गरम झाल्यावर तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद, जिरं, कडीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आले लसूण पेस्ट घालून नीट भाजून घ्यावे. नीट परतून घ्यावे व 2 ते 3 मिनिटांसाठी परतावे.
 3. परतून घेतल्यानंतर त्या कढई मद्ये कुस्करलेले बटाटे घालून नीट मिक्स करून घ्यावे व 2 मिनिटांसाठी मध्यम आचेवर गॅस वर परतावे. आता कढई मद्ये चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. मिक्स केल्यानंतर आता निंबाचे रस घालावे आणि परत मिक्स करून घ्यावे.
 4. मिक्स केल्यावर आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी 10 मिनिटांसाठी ठेवून द्या.
 5. मिश्रण थंड झाल्यावर ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे आणि त्याला चपटे करून ताट वर ठेवावे. असे सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घ्यावे.
 6. आता बटाटा वाड्याच्या बाहेरून आवरणासाठी पहिले एक भांड घेऊन त्यामधे बेसन पिठ टाकावे आणि त्यामधे पाणी घालून चांगले मिश्रण तयार करावे. लक्षात ठेवा मिश्रण मध्यम जाडी चा असावा. आता त्या पिठा मद्ये 1/2 चमचा हळद, सोडा आणि चवीनुसार मिठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. पीठ पातळ किंवा जास्त जाड होऊ नये ह्याची खात्री घ्या.
 7. आता एक कढई घ्या त्यामधे बटाटे वडे बुडून तळतील तेवढे तेल घालून मध्यम आचेवरील गॅस वर गरम करावे. तेल गरम झाले आहे की नाही ह्याची खात्री करण्यासाठी पहिला बनवलेल्या बेसन च्या पीठ मधील एक थेंब पीठ तेलात टाकावे. जर ते तळून वरती आले तर तेल बरोबर गरम आहे. आता तुम्ही वडे तळू शकता.
 8. वड्याच्या आवरणाचे बनवलेले गोळे घेऊन ते बेसनाच्या पिठात बुडवून तेलात तळून घ्यावे. असे सगळे वडे तळून घ्यावे आणि शेवटी जर तुम्हाला तळलेल्या मिरच्या हव्या असतील तर हिरव्या मिरच्या मधून कट करून तळून घ्यावे.
 9. पाव घेऊन मधून कट करून त्यामधे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी टाका आणि त्यावर वडे ठेवून वडापाव सर्व्ह करा.

Related posts

Leave a Comment