Veg Manchurian recipe in Marathi

भारतीय चायनीज पदार्थांमध्ये व्हेज मंचुरियन हा एक अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. अनेक चायनीज फूड प्रेमींना व्हेज मंचुरियन खायला आवडते.

Veg Manchurian recipe in Marathi

पण आपल्याला माहित नाही की बाहेर बनवलेल्या चायनीज फूडमध्ये अजिनोमोटो मीठ जास्त प्रमाणात मिसळले जाते, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणूनच चायनीज खायचे असेल तर घरीच शिजवून खा.

आज आम्ही तुमच्यासोबत या पोस्टच्या माध्यमातून व्हेज मंचुरियनची सर्वात सोपी रेसिपी शेअर करणार आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपी तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा.

वेज मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • 1 वाटी कोबी
 • 1/4 वाटी शिमला मिरची बारीक चिरलेली
 • 1/4 वाटी बारीक चिरलेले गाजर
 • आर्धा वाटी कांदापात
 • दीड कप मैदा
 • 2 चमचे कॉर्न फ्लोअर
 • 2 चमचे लाल तिखट पावडर
 • 1 चमचा व्हाइट पेपर पावडर
 • 1 चमचा गरम मसाला
 • 2 चमचे आल् लसूण पेस्ट
 • चवीनुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल
 • 2 गढे लसूण
 • 10 काश्मिरी लाल मिरच्या भिजवलेल्या
 • 1/2 छोटा चमचा खाण्याचा रंग

कृती:

 1. वेज मंचूरियन अर्थात कोबी मंचुरियान बनविण्यासाठी सर्वात पहिला कोबी, गाजर आणि शिमला मिरची घेऊन बारीक चिरून किंवा खिसून घ्यावे.
 2. भाज्या खिसून किंवा बारीक चिरून झाल्यावर एक बाऊल किंवा भांड घेऊन त्यामधे हे चिरलेल्या भाज्या, कॉर्न फ्लोअर, लाल तिखट पावडर, मैदा, गरम मसाला, आल लसूण च पेस्ट, व्हाइट पेपर, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा रंग घालून नीट मिक्स करून घ्यावे.
 3. लागेल तेवढे पाणी हळू हळू टाकत एक पिठाचे गोळे मळून तयार करून घ्यावे.
 4. पीठ मळून झाल्यावर त्याचे बारीक बारीक गोल आकरमढे गोळे तयार करून ठेवावे.
 5. एक कढई घ्यावे आणि त्यामधे तळण्यासाठी तेल टाकून मध्यम आचेवर गॅस वर गरम करण्यास ठेवून द्यावे.
 6. तेल गरम होताच त्यामधे हे मंचूरियान बॉल्स नीट तळून घ्यावे आणि एका साइडला ठेवून द्यावे.
 7. आता आपण शेझवान सॉस किंवा चटणी बनवणार आहोत. शेझवान चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम लसूण घ्या आणि त्याला बारीक चिरून ठेवा.
 8. आता एक कढई घ्या त्यामधे तेल टाकून मध्यम आचेवर गॅस वर गरम होण्यास ठेवून द्यावे, तेल गरम होताच त्यामधे बारीक चिरलेले लसूण टाकून नीट भाजून घ्यावे. लसूण ला लाल रंग येऊ देऊ नका.
 9. थोड्या वेळाने त्यामधे काश्मिरी लाल मिरची चे पेस्ट टाकून त्यामधे चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
 10. 5 से 7 मिनिटांसाठी हे मिश्रण नीट भाजून घ्यावे. जेव्हा तुम्हाला वाटेल ही चटणी खाण्यासाठी परफेक्ट म्हंजे घट्ट झाली आहे. तेव्हा गॅस बंद करा.
 11. आता तुमचे वेज मांचूरियन तयार आहे. तुम्ही असे चटणी आणि मांचुरियन वेग वेगळे खाऊ शकता पण जर तुम्ही दोघांना एका बाउल मधे मिक्स करून त्यामधे हिरव्या कांद्याच्या पालाचे बारीक तुकडे टाकून खलात तर अजून मज्जा येईल.

Related posts

Leave a Comment