व्हेज पुलाव रेसिपी इन मराठी | Veg Pulao Recipe In Marathi

मित्रांनो सर्वांना नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट द्वारे वेज पुलाव कसे बनवतात हे जाणुन घेणार आहोत. व्हेज पुलाव बनविणे खूप सोपे आहे आणि हे एक चांगले ब्रेकफास्ट ऑप्शन ठरू शकते.

काही लोकांना पुलाव आणि व्हेज बिर्याणी यामधे फरक नाही कळत किंवा ते चेष्टा करतात. तर मित्रांनो व्हेज पुलाव हे कढई मधे म्हणजे थोडक्यात गॅस वर बिना झाकणाच्या भांड्यात बनविले जाते. तसेच व्हेज बिर्याणी हे हंडी मधे बनवली जाते.

खूप लोकांना व्हेज पुलाव हे आवडत असते खाण्यासाठी. आपल्याला आज किक्तेक प्रकारचे पुलाव दिसतील हॉटेल्स मधे जसे गाजर पुलाव, नाशिक पुलाव आणि वगेरे. खाण्यात तर सगळे पुलाव सारख्या टेस्ट चे असतात.

तर चला मित्रांनो व्हेज पुलाव रेसिपी ला सुरुवात करूया. जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत ही रेसिपी शेअर करा.

व्हेज पुलाव रेसिपी इन मराठी:

Veg Pulao Recipe in Marathi

व्हेज पुलाव बनविण्यासाठी लागणारी सामग्री:

 • 2 वाट्या बासमती तांदुळ
 • 1 बटाटा मोठ्या तुकड्यांमध्ये
 • 1/2 वाटी घेवडा
 • 1/2 वाटी ढोबळी मिरची बारीक चिरलेली
 • 2 बारीक चिरलेले गाजर
 • 1/2 वाटी वाटाणा
 • पाव वाटी शेंगदाणा
 • 1 बारीक चिरलेला टोमॅटो
 • 1 कांदा उभ्या आकारात चिरलेला
 • 1 मोठे चमचा आल लसूण पेस्ट
 • 1 चमचा जिरं
 • 1 तमालपत्र
 • 2 उभ्या चरीलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1 इंच दालचिनी तुकडा
 • 4 लवंग
 • 8 काळी मिरी
 • 1इलायची (वेलची)
 • 4 वेलदोडे
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1/2 चमचा हळद
 • 1 चमचा गरम मसाला
 • 2 मोठे चमचा तेल
 • ताजी कोथिंबीर बारीक चिरलेली (वरून टाकण्यासाठी)
 • 2 चमचे तूप

व्हेज पुलाव बनविण्याची कृती:

 1. व्हेज पुलाव बनविण्यासाठी सर्वात पहिला एक भांड घ्या त्यामधे 2 वाटी बासमती तांदुळ टाका आणि स्वच्छ पाण्याने 3 वेळा हे तांदुळ नीट धुवून घ्या. लक्षात ठेवा आपल्याला ह्या तांदुळ मधील स्टार्च काढायचे आहे. हे झाल्यानंतर स्वच्छ पाण्यामधे तांदुळ 30 मिनिटांसाठी भिजत साईड ला ठेवून द्या.
 2. आता एक कढई किंवा जर तुमच्या कढे कढई नसेल तर मग कूक्कर घ्या, त्यामधे तेल आणि तूप टाकून गॅस वर मध्यम आचेवर ठेवून तेल आणि तूप गरम हौद्या.
 3. जेव्हा तेल गरम होईल तेव्हा त्यामधे जिरे टाका, जिरे तडकल्यानंतर त्यामधे 1 तमालपत्र, दालचिनी तुकडा 1 इंच, 8 काळी मिरी, 4 लवंग, 1 इलायची (वेलची), आणि 4 वेलदोडे टाका आणि हे सगळे छान भाजून घ्या.
 4. जो पर्यंत ह्या सर्व मसाल्यांना खमंग वास सुटत नाही तो पर्यंत हे मसाले नीट भाजून घ्या.
 5. सुगंधित वास सुटल्यानंतर यामधे बारीक लांब चिरलेले कांदे टाका आणि सोनेरी होऊ पर्यंत नीट हे ही भाजून घ्यावे. कांदा सोनेरी झाल्यावर त्यामधे आल लसूण पेस्ट, हिरवी मिरची, आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाका आणि टोमॅटो मॅश होऊ पर्यंत नीट 3 मिनिटे भाजून घ्या.
 6. आता ह्या कढई मधे किंवा कुक्कर मधे 2 चिरलेली ढोबळी मिरची, 2 चिरलेले गाजर, 1 चिरलेला बटाटा, आर्धी वाटी घेवडा, पाव वाटी शेंगदाणा आणि आर्धा वाटी वाटाणा टाकून नीट 4 मिनिटांसाठी भाजून घ्या.
 7. जर भाज्या भाजून मऊ झाल्या असतील तर आता आपण आधी भिजून ठेवलेले तांदुळ ठेवलेले भांड घ्या, आणि त्यामधील सर्व पाणी वेगळं करून हे तांदुळ कढई मधे टाका.
 8. मसाले नीट मिक्स हाउद्या म्हणून, हाताने किंवा चमचाने नीट तांदुळ मिक्स करून घ्या.
 9. आता कढई मधे गरम मसाला, हळद, आणि जसे लागेल तसे चवी नुसार मीठ टाकून नीट सगळ मिश्रण मिक्स करून घ्यावे.
 10. आता आपण 2 वाटी बासमती तांदूळ घेतला होता, म्हणून 3 तांबे पाणी टाकून घ्यावे म्हणजे 1 वाटी तांडलासाठी 11/2 तांबे पाणी घालावे. तुमच्या हिशेबाने नीट पाणी लागेल तेवढे घाला.
 11. आता ह्या सर्व मिश्रणाला नीट मिक्स करून घ्यावे आणि उकळी येईपर्यंत गॅस चा आच म्हणजे फ्लेम वाढवा. आणि एकदा उकळी आल्यानंतर गॅस चे आच मध्यम आचेवर करून कढई वर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे मिश्रण नीट शीझवून घ्यावे.
 12. तुम्ही तांदळाचे एक भाग घेवून चेक करू शकता तांदुळ नीट शिजले आहे की नाही हे. जर तांदुळ नीट शिजले नसले तर आणखी 2 ते 3 मिनिटांसाठी शिज्वून घ्यावे.
 13. मिश्रणातील तांदुळ शिजून झाल्यानंतर गॅस बंद करा आणि 5 मिनिटांसाठी झाकण लावून तसेच ठेवून द्यावे.
 14. आता आपला व्हेज पुलाव हा तयार आहे, एक चमचा घ्या आणि त्याच्या साहाय्याने पुलाव नीट मिक्स करून घ्यावे आणि सर्व्ह करताना किंवा आताच बारीक चिरलेले कोथिंबीर टाका.

व्हेज पुलाव बेस्ट बनविण्यासाठी काही बेस्ट प्रो टिप्स:

 • व्हेज पुलाव मधे तुम्हाला जे तांदुळ वापरायचे आहे ते सुट्ट सूट्ट असणे गरजेचे आहे, जर बासमती लांब तांदुळ वापरले तर उत्तमच. तांदुळ कुठला वापरला आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जर तुम्ही दूध भाताचे तांदुळ वापरले तर तो पुलाव नाही तर खिचडी होईल.
 • तांदुळ कुठला वापरायचा आहे हे ठरवण्या सोबत तांदुळ कसे आणि किती वेळ शिझवायचे आहे महत्वाचे आहे. तांदुळ शिवण्याच्या आधी हे लक्षात घ्या की तांदुळ वरील सगळे स्टार्च हे पाण्याने नीट निघून गेले आहे की नाही. जर नाही तर तांदुळ पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
 • व्हेज पुलाव चा जो चव असतो तो जास्त करून हे त्याच्यात वापरण्यात आलेल्या मसाल्यांचा असतो. सगळे चांगले आणि फ्रेश मसाले वापराल व्हेज पुलाव बनविण्यासाठी याची नीट काळजी घ्या.
 • भाजीपाला देखील महत्त्वाचा घटक आहे व्हेज पुलाव बनवताना. जर चांगले भाजीपाला वापरले तर व्हेज पुलाव मधे टेस्ट चांगला येईल.
 • पुलाव वरती बारीक चिरलेले कोथिंबीर नक्की टाका, त्याने पुलाव चा टेस्ट चांगला स्वादिष्ट होईल. लिंबू हवा असेल तर लिंबाचा रस देखील पिळू शकता.

Related posts

Leave a Comment