कोथिंबीर वडी रेसिपी मराठी | Kothimbir Vadi Recipe

महाराष्ट्र म्हणजे वेग वेगळ्या प्रकारच्या अनेक भाज्या आणि स्नॅक्स साठी खूप फेमस आणि टेस्टी आहे. त्यामधे जर मराठी म्हणजे सांस्कृतिक डिश म्हंटले तर त्या डिश च्या नावानेच सर्वांना पाणी सुटते. आणि त्यामधे जर कोथिंबीर वडी ही सर्वात टेस्टी आणि लोकप्रिय स्नॅक आहे जे लहान वयापासून ते वृद्ध वयापर्यंत सर्व लोकांना खायाला आवडते. ही डिश मेन कोथिंबीर चे असते खायला टेस्टी तर आहेच त्यासोबत शरीराला पोषक गुण देणारे देखील आहे.

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • 1/2 वाटी बेसन
  • 2 मोठे चमचा तांदळाचे पीठ
  • कोथिंबीर 2 कप बारीक चिरून
  • 1 मोठे चमचा तेल
  • 1 मोठा चमचा लिंबाचा रस
  • 1 मोठे चमचा तीळ
  • 1 इंच केलसलेला आल्
  • 1 हिरवी मिरची चे बिया काडून बारीक केलेले
  • 1/2 छोटे चमचे लाल मिरची पावडर
  • 1/4 छोटे चमचे गरम मसाला
  • 1/4 छोटे चमचा बेकिंग सोडा
  • तळण्यासाठी लागणारे तेल
  • 1/2 छोटे चमचे हळदी पावडर
  • चवीनुसार मीठ

कृती:

  1. कोथिंबीर वडी बनविण्यासाठी सर्वात पहिला एक भांडी घ्या त्यामधे बेसन आणि तांदळाचे पीठ टाकून नीट हे दोन पीठ मिक्स करून घ्यावे. ह्या बेसन आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घाला आणि जसे आपण भजी साठी पीठ करतो तसे जरा घट्ट पीठ करून घ्यावे.
  2. आता ह्या मिश्रणामध्ये हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली, हिरवी मिरची, आले पेस्ट, हळद, लाल तिखट पावडर, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा तेल घालून हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या.
  3. आता आपण हे मिश्रन नीट वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक कुक्कर घ्या आणि त्यामधे 2 कप पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवून ते कूक्कर गॅस वर गरम होण्यास ठेवून द्यावे.
  4. आता मिश्रना मधे बेकिंग सोडा घालून मिश्रण एकदा मिक्स करून घ्या. नीट मिक्स करा जेव्हा तुम्हाला मिश्रण नीट फुलल्या सारखे दिसेल तेव्हा मिक्स करणे थांबवा आणि एक भांड घ्या त्याला एक चमचा तेलांने नीट पुसून घ्या आणि त्यामधे मिश्रण टाका. लक्षात ठेवा हे भांडे कुक्कर मधे नीट बसले पाहिजे.
  5. आता कुक्कर गरम झाले असेल नीट त्यावरील झाकण काढून त्यामधे हे भांडे ठेवावे आणि किमान 15 मिनिटांसाठी शिजू द्या. लक्षात ठेवा शिट्टी वाजू देवू नका त्यासाठी शिट्टी तुम्ही पहिलंच काढून ठेवू शकता. गॅस मध्यम फलेम् वर असावे. मिश्रण नीट शिजले आहे की नाही हे बघण्यासाठी त्यामधे चाकू किंवा चमचा घालून बघून घ्यावे.
  6. आता ह्या मिश्रणाचे तुम्हाला हवे तसे तुकडे करून घ्यावे. आणि एक कढई घ्या आणि त्यामधे तळण्यासाठी तेल टाकून गॅस वर कढई ठेवून द्या. तेल जसे गरम होईल हे सर्व तुकडे नीट तळून घ्या. सोनेरी रंग येऊ पर्यंत नीट तळून घ्या.
  7. आपली कोथिंबीर वडी तयार आहे ह्याला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करू शकता.

कोथिंबीर वडी रेसिपी मराठी

Related posts

Leave a Comment