चिकन बिर्यानी रेसिपी मराठी | Chicken Biryani Recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण चिकन बिर्याणी कसे बनवतात हे मराठी मधे शिकणार आहे. जर तुम्हाला ही चिकन बिर्याणी रेसिपी आवडत असेल तर आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना नक्की शेअर करा.

Chicken Biryani Recipe in Marathi

चिकन बिर्याणी हे सर्वात फेमस आणि स्वादिष्ट नॉन वेज डिश आहे. चिकन बिर्याणी जास्त करून हैद्राबाद मधे खाल्ले जाते. आणि चिकन बिर्याणी जितके स्वादिष्ट आहे तितकेच सोप्पी ह्याची रेसिपी आहे. तर चला मित्रानो आता आपण रेसिपी ची सुरुवात करुया.

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

चिकन बिर्याणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • 1 ते 2 दालचिनी चे तुकडे
  • 4 काळीमिरी
  • 5 लवंग
  • 1 हिरवी वेलची
  • 1 चक्री फुल
  • 1 जवित्री
  • 2 दगड फुल

वरील सर्व साहित्य एकत्र करून एका मिक्सर जार मधे घालून नीट ग्राईंड करून घ्या. आता तुमचा बिर्याणी मसाला तयार आहे. एका भांड्यात काढून ठेवा.

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • 500 ग्रॅम मध्यम पिस मधील चिकन
  • आल लसूण चे पेस्ट
  • 2 चमचे हळद
  • 2 चमचे लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • 1 वाटी दही
  • 1 वाटी लाल तिखट पावडर
  • 2 चमचे धने पावडर
  • 1 चमचा जिरं पावडर
  • 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 3 चमचे पुदिना
  • 1 वाटी शुद्ध तूप किंवा तेल
  • 1 वाटी तळलेला कांदा
  • 1 वाटी पिठाची कणी
  • 1 ते 2 कप धुवून ठेवलेले बासमती तांदूळ
  • 1 चमचा शाह जीरा
  • 5 काळीमिरी
  • 1 काळी वेलची
  • 2 दालचिनी
  • 5 लवंग
  • 3 तमालपत्र
  • आर्धा वाटी केशर चे पाणी

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी प्रक्रिया (Chicken Biryani Marathi Recipe) :

  1. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी पहिला 500 ग्रॅम चिकन घ्या आणि नीट स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. आता आपण चिकन मॅरीनेट करूया, चिकन ला एका भांड्यात ठेवा आणि त्यामधे अरधा चमचा हळद, आल लसूण पेस्ट, एक चमचा लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, 2 चमचे बिर्याणी मसाला, एक वाटी दही, एक चमचा लाल तिखट पावडर, एक चमचा धणे पावडर, आर्धा चमचा जिरं पावडर, 3 पुदिनाचे पाने, एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि 3 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
  2. हे मिश्रण नीट मिक्स करून झाल्यावर 4 ते 5 तासांसाठी फ्रिझ मद्ये ठेवून द्यावे.
  3. आता एक कढई घ्या त्यामधे तूप किंवा तेल टाकून कढई मध्यम आचेवरील गॅस वर गरम करण्यास ठेवावे.
  4. आता आपण मॅरीनेट करण्यासाठी ठेवलेला चिकन फ्रीज मधून काढून त्या कढई मद्ये नीट भाज्जून घ्यावे. भाजल्यानंतर त्यामधे पाणी घालावे.
  5. आता 2 ते 3 चमचे तूप चिकन वरून टाकावे आणि मिक्स करून घ्यावे, त्या नंतर थोडा तळलेले कांदा टाकावे.
  6. आता हे कढई मधील मिश्रण नीट झाकून ठेवावे, झाकण्यासाठी कणीक चा नीट वापर करा. कणीक ने झाकण आणि कढई नीट बंद करून ठेवा.
  7. आता एक दुसरी कढई घ्यावे आणि त्यामधे 4 ते 5 कप पाणी घालून मध्यम आचेवर गॅस वर ठेवून द्यावे.
  8. जेव्हा पाण्यात उकल येऊ लागेल तेव्हा त्यामधे एक चमचा शाह जीरा, 2 काळी वेलची, 4 काळी मिरी, 2 दालचिनी तुकडे, 5 लवंग, 1 चमचा तूप, 3 तमालपत्र, 2 चमचे मीठ, आणि 2 कप धुलेले बासमती तांदूळ टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
  9. लक्षात घ्या हा भात 60 टक्के च शिजवून घ्यावे जास्त किंवा पूर्ण शिझवू नका.
  10. आता तुमचा बिर्याणी साठी भात तयार झाला असेल तर गॅस बंद करा आणि एक मोठ्या प्लेट मध्ये हे तांदूळ पसरून टाकावे.
  11. आता आपण चिकन बिर्याणी चे लेयरिंग करणार आहोत, एक मोठे भांडे घ्या त्यामधे पहिला साईड ने नीट तूप लावून घ्यावे आणि चिकन नसलेली ग्रेव्ही टाकावे.
  12. ग्रेव्ही वर शिझवलेळे तांदूळ टाका आणि त्यावर परत चिकन ग्रेव्ही टाका. ही स्टेप 2 ते 3 वेळा करा आणि नीट लेयारींग करा. लेरींग करताना मधी मधी तळलेले कांदा टाका.
  13. शेवटी तांदळा वर केशराचे पाणी घालावे. त्यावर थोडा चिकन बिर्याणी मसाला घाला.
  14. आता त्यावर पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा, 2 चमचे तूप आणि साईड मधून नीट कणिक लावून ठेवा.
  15. आता हे भांडे मध्यम आचेवर गॅस वर गरम करून ठेवावे. 10 ते 15 मिनिटांसाठी नीट चिकन बिर्याणी शीझवा.
  16. आता गॅस कमी करा आणि 5 मिनिटांसाठी गरम करा.
  17. आता तुमचे चिकन बिर्याणी तयार आहे पण थांबा पहिला गॅस बंद करा आणि 5 ते 10 मिनिटांसाठी भांडे थंड होऊद्या.
  18. आता तुमचे चिकन बिर्याणी तयार आहे नीट मिक्स करून घ्यावे आणि ह्या चिकन बिर्याणी सोबत कोशिंबीर सर्व्ह करा.

Related posts

Leave a Comment