व्हेज पुलाव मराठी रेसिपी | Veg Pulao recipe in Marathi

व्हेज पुलाव हे महाराष्ट्रातील नवे तर संपूर्ण भारतात खाली जाणारी फेमस आणि स्वादिष्ट डिश आहे. वेज पुलाव हे थोडी फार बिर्याणी सारखे असते पण बिर्याणी आणि पुलाव मधील फरक आज पर्यंत कोणी शोधला नाही. 

व्हेज पुलाव मराठी रेसिपी

वेज पुलाव हे जास्त करून व्हेज लोक खूप खाणे पसंद करतात. हे जितके स्वादिष्ट आहे तितकीच सोप्पी ह्याची रेसिपी आहे. तुम्ही व्हेज पुलाव एका कुकर मद्ये किंवा कढई मद्ये देखील बनवू शकता. आज आम्ही ह्या पोस्ट च्या माध्यमातून तुमच्या सोबत व्हेज पुलाव बनवण्याची सर्वात सोप्पी आणि बेस्ट रेसिपी शेअर करणार आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रांना आणि घरच्यांना नक्की शेअर करा. 

पुलाव कसा बनवतात (How to make Veg Pulav recipe in marathi) : 

पुलाव हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खाल्ला जाणारा भाताचा एक प्रकार आहे. आपण पुलाव हे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात खाल्लाच असाल, जास्त करून बडे आणि लग्नामध्ये पुलाव जास्त बनवले जाते. पुलाव बनवण्यासाठी फक्त काही मसाले, भात आणि भाज्या लागतात. ही सर्वात सोप्पी आणि लवकर तयार होणारी रेसिपी आहे. तर चला व्हेज पुलाव बनवण्याची रेसिपी ची सुरुवात करुया. 

व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients for Veg Pulao): 

 • बासमती तांदूळ 1 वाटी 
 • 1 मोठं चमचा तेल किंवा तूप
 •  2 ते 3 वाटी पाणी 
 • 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलेला
 • 1 लांब उभा चिरलेला टोमॅटो 
 • 3 ते 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1 उभी चिरलेली शिमला मिरची
 • 1 छोटी वाटी बारीक चिरलेले गाजर
 • 1/4 वाटी मटार 
 • 1 चमचा आले लहसुण पेस्ट 
 • 1/2 वेलची पावडर
 • 2 चमचे काजू चे तुकडे
 • 2 मोठे चमचे बारीक चिरलेले कोथिंबीर 
 • 1 चमचा गरम मसाला पावडर 
 • चवीनुसार मीठ

व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणारे खडे मसाले: 

 • 1 वेलदोडे मसाला 
 • 1 बदाम फुल 
 • 2 तमाल पत्री पाने 
 • 4 लवंग 
 • आर्धा चमचा जिरे 
 • 2 वेलदोडे 

व्हेज पुलाव बनवण्यासाठी कृती (Instructions for Veg Pulao recipe) : 

वेज पुलाव कुकर पद्धतीने 

 1. वेज पुलाव कुकर पद्धतीने बनवण्यासाठी पहिला तांदूळ एका भांड्यात घेऊन नीट स्वच्छ धुवून घ्यावे. 
 2. आता हे तांदूळ 15 ते 20 मिनिटांसाठी स्वच्छ पाण्यात नीट भिजवून ठेवा. 
 3. आता एक कुकर घ्या आणि मध्यम आचेवर गॅस वर कुकर ला गरम करा. 
 4. कुकर गरम झाल्यावर त्यामधे तेल टाका आणि तेल गरम झाल्यावर त्यामधे सगळे खडे मसाले जसे की बदाम फुल, लवंग, जिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे आणि साधे वेलदोडे घालून नीट छान सुगंध येऊ पर्यंत भाजून घ्यावे. 
 5. आता मसाल्यांचा वास आल्यानंतर त्यामधे कांदा, टोमॅटो, आले लसूण पेस्ट, आणि हिरव्या मिरच्या घालून हे ब्राऊन होऊ पर्यंत नीट परतून घ्यावे. 
 6. त्यानंतर त्या कुकर मध्ये चिरलेले गाजर, शिमला मिरची, आणि मटार घालून नीट भाजून घ्यावे आणि नीट मिक्स करून घ्यावे. 
 7. आता ह्या कुकर मध्ये गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. 
 8. आता त्यामधे भिजवलेले बासमती तांदूळ घालून नीट मिक्स करून घ्यावे. 
 9. आता पाणी घालून कुकर चे झाकण लावून, 10 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजू द्यावे. किमान 4 शिट्ट्या होऊ पर्यंत नीट भात शिजू द्यावे. 
 10. आता तुमचे पुलाव 10 मिनिटांनी तयार आहे, हे पुलाव सर्व्ह करताना त्यावर बारीक चिरलेले कोथिंबीर आणि तळलेले काजू टाकून कोशिंबीर सोबत सर्व्ह करावे. 

पुलाव कढईमध्ये बनवण्याची पद्धत (Tawa Pulao Recipe in Marathi) : 

 1. तवा पुलाव किंवा कढई मधील पुलाव बनवण्यासाठी सर्वात पहिला एक भांडे घेऊन त्यामधे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. 
 2. आता त्या भांड्यात पाणी, एक दालचिनी तुकडा, आणि 3 काळी मिरी टाकून मध्यम आचेवर गॅस वर गरम करण्यास ठेवावे. लक्षात घ्या तांदूळ जास्तीत जास्त फक्त 80 टक्के शिजलेला असायला हवा. 
 3. 80 टक्के तांदूळ शिजून झाल्यावर ते तांदूळ भांड्यातून बाहेर काढून एका मोठ्या प्लेट मध्ये नीट पसरून घ्यावे. 
 4. आता एक कढई घ्या आणि त्यामधे तेल टाकून तेल गरम झाल्यावर काजू नीट भाजून घ्यावे. भाजलेले काजू देखील एका प्लॉट मधे काढून ठेवावे. 
 5. आता कढई मधे तेलामध्ये बदाम फुल, जीरा, लवंग, मसाला वेलदोडे, आणि साधे वेलदोडे घालून चांगलं वास येऊ पर्यंत नीट भाजून घ्यावे. 
 6. आता या कढई मधे आले लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून कांदा थोडा ब्राऊन कलर छा होऊ पर्यंत नीट भाजावे. त्यानंतर त्यामधे चिरलेले शिमला मिरची, हजार आणि मटार घालून नीट मिक्स करून घ्यावे. 
 7. आता मग त्या मिश्रण मद्ये चवीनुसार मीठ, गरम मसाला घालून नीट छान मिक्स करून घ्यावे. 
 8. आता कढई मधे जे 80 टक्के शिझवळेले तांदूळ घालून गॅस मंद आचेवर करून 10 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवावे. 
 9. 10 मिनिटांनंतर तुमचा पुलाव तयार आहे त्यामधे तळलेले काजू, आणि बारीक चिरलेले कोथिंबीर टाकून नीट मिक्स करून घ्यावे. 
 10. तुम्ही हे पुलाव चिरलेले कांदे किंवा कोशिंबीर सोबत खावू शकता. 

Related posts

Leave a Comment