आलू पराठा मराठी रेसिपी | Aaloo Paratha Recipe in Marathi

आजवर प्रत्येकाने आलू पराठा खाल्ला असेलच, त्याची टेस्ट जितकी चवदार तितकीच बनवायला सोपी. जर तुम्हाला बटाट्याचा पराठा कसा बनवायचा हे शिकायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आज या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आलू पराठा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

आलू पराठा

आलू पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • 3 ते 4 कप गव्हाचे पिठ
 • 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
 • 1 चमचा लसूण चे पेस्ट
 • 1.5 चमचे हिरव्या मिरच्यांचा ठेचा
 • 0.75 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1 छोटे चमचा जिरे
 • 1 लहान चमचा जिरेपूड
 • चवीनुसार मीठ
 • 1 मोठं चमचा बटर

पराठा बनवण्यासाठी कृती:

 1. आलू पराठा बनवण्यासाठी पहिला एक भांड घ्या आणि त्यामधे घावाचे पीठ घालून त्यामधे मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. आणि लागेल तेवढे पाणी टाकत पिठाचे कणीक मळून घ्यावे.
 2. आता आपण पराठाची फिलिंग तयार करूयात, सर्वात पहिला उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे आणि ते एका भांड्यात घेऊन त्यामधे मिरची चा ठेचा, लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे पूड, जीरा, आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.
 3. घवाच्या पीठाचे कानिकाचे आणि हे बटाट्याचे मिश्रणाचे नीट समान गोळे बनवून घ्यावे.
 4. आता पोळपाट लाटणे घ्यावे आणि त्याला जरा तेल लावून 3 ते 4 इंची पोळी लाटून घ्यावे.
 5. पोळी लाटून झाल्यावर त्याच्या मधोमध बटाट्याचे मिश्रणाचे गोळे ठेवून पीठा ला पुरण पोळी सारखे बनवावे. आणि परत लाटावे, लाटताना आता पोळी ला घवाचे पीठ लावून लाटून घ्यावे.
 6. आता आपले आलू चे पराठे तयार आहेत, एक तवा घ्यावे आणि मध्यम आचेवर गॅस वर गरम करण्यास ठेवून द्यावे. तवा गरम होताच त्यांवर तूप किंवा बटर टाकून त्यावर हे पराठे भाजून घ्यावे.
 7. हे पराठे तुम्ही दही किंवा टोमॅटो केचप सोबत किंवा चटणी सोबत खावू शकता.

Related posts

Leave a Comment